Home महाराष्ट्र coronavirus patient in thane: ठाण्यात करोनाचा विळखा अधिकच घट्ट, कल्याण-डोंबिवलीमध्ये उच्चांकी ५६०...

coronavirus patient in thane: ठाण्यात करोनाचा विळखा अधिकच घट्ट, कल्याण-डोंबिवलीमध्ये उच्चांकी ५६० रुग्णांची नोंद – 392 corona virus positive patient found in thane


म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जिल्ह्यात करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होऊ लागला असून गुरुवारी जवळपास दोन हजाराच्या आसपास रुग्ण वाढले. यापैकी सर्वाधिक कल्याण-डोंबिवलीमध्ये ५६० रुग्णांची नोंद झाली असून ठाण्यात रुग्णांच्या संख्येत ३९२ने वाढ झाली. इतरही शहरात कमी-जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. (Corona update in thane)

तर, गुरुवारी जिल्ह्यात ३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडाही वाढला आहे. आजपर्यंत एकूण १ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. परंतु रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून गुरुवारी तब्बल १ हजार ९१८ नवीन रुग्ण समोर आले. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा ३६ हजार ५६७ वर गेला आहे.

गुरुवारच्या रुग्णवाढीनंतर ठाणे शहरातील रुग्णांची संख्या ९ हजार ५३० (मृत्यू ३५२) इतकी झाली आहे. कल्याण-डोंबिवली ७ हजार ४८५ (मृत्यू १२७), नवी मुंबई ७ हजार ८८ (मृत्यू २२४), मिरा भाईंदर ३ हजार ६०९ (मृत्यू १४९), उल्हासनगर २ हजार १५६ (मृत्यू ४७), भिवंडी २ हजार १११ (मृत्यू ११४), अंबरनाथ १ हजार ९३१ (मृत्यू ५२), बदलापूर ८५८ (मृत्यू १५) आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ७९९ (मृत्यू ५०) रुग्ण आढळले आहेत.

वाचा: राज्यात करोनामुक्तांची संख्या लाखावर; आज तब्बल ८०१८ रुग्ण झाले बरे

जिल्ह्यात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना

करोनाची साखळी शक्य तितक्या लवकर तोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असून बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण भागासाठी पाच चाचणी केंद्र सुरु करण्यात येतील. तसेच दहा दिवसात कोविड संदर्भातील सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या. टोपे यांनी बदलापूरर, अंबरनाथ येथील करोना साथीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बदलापूर, अंबरनाथ मधील रुग्णांना शहरातच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जेणेकरून येथील रुग्णांना मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही. बदलापूर जवळील हर्णे आयुर्वेदिक कॉलेज जिल्हा प्रशासन ताब्यात घेत असून तेथे ५० बेड्चे आयसीयू सुविधा असलेले रुग्णालय लवकर सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश टोपे यांनी दिले.

वाचाः पुण्याने गाठला २५ हजारचा टप्पा; आकडा फुगण्याचे ‘हे’ आहे कारणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारस्थानांची सत्यकथा

विवेक गोविलकर यांचे '' हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या या लेखकाला दोनदा शोध पत्रकारितेचा...

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

Recent Comments