Home शहरं मुंबई coronavirus patient situation: devendra fadanvis letter to cm: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील १०००...

coronavirus patient situation: devendra fadanvis letter to cm: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील १००० मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल – devendra fadnavis send letter to cm uddhav thackeray over coronavirus patient situation in maharashtra


मुंबईः ‘गेल्या तीन- साडेतीन महिन्यात किमान १००० मृत्यू मुंबईत झाले आहेत. मात्र, त्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेला नाही.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र धाडले आहे. (devendra fadanvis letter to cm)

‘रुग्णालयांबाहेर झालेल्या करोना रुग्णांचे मृत्यू अद्यापही दाखवण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेलं असूनही या रुग्णांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाहीये. आकडेवारीची अचूकता हाच करोनाविरोधातील लढाईसाठी मुख्य आधार असल्यानं याकडे लक्ष,’ देण्याची मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

वाचाः आशा सेविकांच्या मानधनात वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

‘प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः राज्यात २८ जूनपासून पुन्हा सलून सुरू होणार, फक्त केसच कापणार!

‘करोनाविरूद्धच्या लढाईत कोणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रूग्णसंख्या आढळली, संसर्ग (इन्फेक्शन) किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच आणि रणनीती आखून त्याला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. त्यामुळं ही विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना आपण संबंधितांना द्याल,’ असेही या पत्रात म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray without mask: Nashik: मास्क न घालताच राज ठाकरे नाशिकमध्ये; माजी महापौरांना म्हणाले… – mns chief raj thackeray in nashik without wearing mask

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी...

chandrkant patil on maratha reservation: नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जा; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा – chandrkant patil attacks on maharashtra government over maratha...

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन भाजप आक्रमकभाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारामराठा आरक्षणाचा मुद्द्यांवरुन राजकारण तापलं मुंबई: सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतचं नाही....

farmers protest in france: Farmers protest फ्रान्समध्येही शेतकऱ्यांचा एल्गार, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी – french farmers protest against low earnings deplore high suicide...

हायलाइट्स:फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी सुपरमार्केट्स आणि वितरण केंद्राबाहेर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनमागील वर्षी मंजूर झालेल्या कृषी कायद्यामुळेही दिलासा...

Recent Comments