Home शहरं पुणे coronavirus pimpri chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील दीड महिन्यांच्या बाळाची करोनावर मात - corona update...

coronavirus pimpri chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील दीड महिन्यांच्या बाळाची करोनावर मात – corona update one and half month baby wins fight against coronavirus in pune


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: दीड महिन्यांच्या बाळासह त्याच्या चार वर्षीय भावाने करोनावर मात केली आहे. चिंचवडमधील या भावंडांना १४ दिवसांच्या उपचारानंतर रविवारी (१७ मे) महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

करोनावर मात केलेल्या बाळाची आई मुंबईला डिलिव्हरीसाठी गेली होती. एक महिन्यांनंतर आई व बाळ पुण्याला परतले. त्यानंतर बाळाला ताप आला होता. बाळाला ताप आल्याने त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळामध्ये करोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्याची चाचणी केली असता बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर बाळाचा मोठा भाऊ आणि आजोबा सुद्धा पॉझिटीव्ह आले होते. तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते आता संपूर्ण बरे झाले आहेत.

Live: चिंताजनक! राज्यात आज २३४७ नवे करोनाग्रस्त; ६३ रुग्णांचा मृत्यूदीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावाला पूर्ण बरे करण्यासाठी बालरोग विभाग प्रमुख डॉ. दीपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ. सूर्यकांत मुंडलोड, डॉ. नुपूर कत्रे, डॉ. शीतल खाडे, डॉ. प्राजक्ता कदम, डॉ. गौरव शर्मा, डॉ. सबाहत अहमद, डॉ. अभिजीत ब्याले, डॉ. रिजवना सय्यद, डॉ. कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांनी परिश्रम घेतले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

4th Marathi literary meet: संमेलनस्थळी होणार करोना चाचणी – it has been decided to test the corona of every worker those work for marathi...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून, संमेलनाच्या उभारणीसाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराची...

Rajesh Tope: आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढवा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश – rtpcr testing should be increased to prevent coronavirus says health minister rajesh tope

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे, असे आदेश...

खुनाचा प्रयत्नप्रकरणी पतीला शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, चारचाकी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पती, सासू,...

Recent Comments