Home शहरं पुणे coronavirus pune: करोनारुग्णांसाठी उपयोगी यंत्रणा विकसित - developed useful mechanisms for coronary...

coronavirus pune: करोनारुग्णांसाठी उपयोगी यंत्रणा विकसित – developed useful mechanisms for coronary patients


म. टा. प्रतिनिधी, पुणे

विशिष्ट खोलीतील ऑक्सिजनचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांनी वाढविणारे तंत्रज्ञान पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) विकसित केले आहे. त्याचा वापर करोनाबाधित रुग्णांसह ऑपरेशन थिएटरमधील रुग्ण व अन्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी होऊ शकणार आहे.

पोकळ तंतूंच्या पटलावर आधारित (पॉलिमर मेंब्रेन) तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ऑक्सिजन संवर्धक’ नावाची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ‘एनसीएल’मधील डॉ. उल्हास खरूल यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ही यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेत पॉलिमरपासून तयार केलेल्या पटलांच्या फितींमधून (कार्टिरेज) पाच ते सहा बार दाबासह वातावरणातील हवा सोडल्यावर त्यातून ऑक्सिजन व इतर घटक वेगळे केले जातात. त्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण ३५ ते ४० टक्के वाढते. बेंगळुरू येथील टीयूव्ही राइनलँड इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून या यंत्रणेचे प्रमाणीकरण करून घेण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा परवाना जेनरिच मेंबरेन्स या स्टार्ट अप कंपनीला देण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात साहित्य पुरवठा आणि अन्य अडथळ्यांना तोंड देऊन हे संशोधन करण्यात आले. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीने या यंत्रणेचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन केंद्रित असणे आवश्यक असते. अतिदक्षता विभाग व ऑपरेशन थिएटरमध्ये हे प्रमाण ९० टक्केही असू शकते. करोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यास त्यांची प्रकृती वेगाने सुधारते. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज पडणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. व्हेंटिलेटरच्या वापरानंतर रुग्णांवर या यंत्राचा वापर करून उपचार केल्यास ऑक्सिजन सिलेंडरच्या मागणीत घट होऊ शकते.

‘आणखी १०० युनिट्सची योजना’

सध्या या यंत्रणेचा वापर रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असून यात ५० यंत्रणांचा वापर केला जात आहे. पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात श्वसनासंदर्भात तक्रारी असलेल्या रुग्णांसाठी त्याचा वापर होत आहे. हाताळणीसाठीही ही यंत्रणा अतिशय सुकर, सुलभ आहे. ‘बीईएल’ने कमीतकमी वेळात व कमी मनुष्यबळ उपलब्ध असताना १० युनिट्सची निर्मिती केली. आणखी १०० युनिट्स विकसित करण्याची योजना असल्याचे ‘बीईएल’चे सरव्यवस्थापक के. राजेंद्र यांनी सांगितले.

मेंब्रेनच्या आधारे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवता येते. त्यामुळे या विषयीचे संधोधन काही काळापासून सुरू होते. श्वसनासंदर्भातील विकार असलेल्या रुग्णांसाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली होती. करोना संसर्गात फुफ्फुसावर परिणाम होत असल्याने करोना रुग्णांसाठी वापर करणे शक्य आहे.

– डॉ. उल्हास खरूळ, संशोधक, एनसीएलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments