Home शहरं पुणे coronavirus pune: कोथरूड, कर्वेनगरला रुग्णसंख्येत वाढ - increase in number of patients...

coronavirus pune: कोथरूड, कर्वेनगरला रुग्णसंख्येत वाढ – increase in number of patients at kothrud, karvenagar


म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या दोन आठवड्यांपासून कोथरूड-बावधन, वारजे-कर्वेनगर तसेच औंध आणि बाणेर भागातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मार्चपासून रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या भवानी पेठ, ढोले पाटील रोड या भागात हळूहळू संसर्ग कमी होत आहे. महापालिकेच्या स्मार्ट कंपनीने ७ ते २१ जून या दरम्यान रुग्णसंख्यावाढीचे विश्लेषण केले असता, त्यामधून ही माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत शहरात भवानी पेठ, ताडीवाला रोड, ढोले पाटील रोड, येरवडा, कळस, धानोरी तसेच कोंढवा-येवलेवाडी या भागात रुग्णसंख्या अधिक असल्याचे आढळून येत होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांमध्ये या भागांतील रुग्णसंख्या घटत असल्याचे आढळून आले आहे.

सात ते २१ जून दरम्यान कोथरूड-बावधन भागातील रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोथरूडमध्ये ७ ते १४ जून दरम्यान १४८.२ टक्के, १४ ते २१ जून दरम्यान ११७.३ टक्के रुग्णसंख्या वाढली आहे. १४ ते २१ जून दरम्यान ९८.७ टक्के रुग्ण वारजे-कर्वेनगर भागात वाढले. त्यानंतर औंध आणि बाणेर भागात सर्वाधिक रुग्ण वाढले असून, ७ ते १४ जून दरम्यान रुग्णसंख्या १४०.६ टक्क्यांनी वाढली आहे. १४ ते २१ जून या कालावधीत शहरातील बहुतांश वॉर्डात रुग्ण वाढल्याचे दिसून

आले आहे.धनकवडी-सहकारनगर भागात ४३.१ टक्के, शिवाजीनगर-घोले रोड या भागात ३६.३ टक्के, बिबवेवाडी भागात २४.१ टक्के रुग्ण वाढले आहेत. नगर रोड आणि वडगावशेरीमध्ये १९.९ टक्के, भवानी पेठेत १४ टक्के, येरवडा कळस आणि धानोरी प्रभागात १२.७ टक्के रुग्ण वाढल्याचे चित्र विश्लेषणात नमूद करण्याक आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments