Home शहरं पुणे coronavirus pune: या कारणामुळे होतायत सर्वाधिक करोनाबाधितांचे मृत्यू - Hypoxia Silent Killer...

coronavirus pune: या कारणामुळे होतायत सर्वाधिक करोनाबाधितांचे मृत्यू – Hypoxia Silent Killer Behind Covid-19 Deaths Even For Asymptomatic Patients


मुंबई : करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्यू दर कमीत कमी ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पण हायपोक्सिया म्हणजेच शारीरिक कार्ये चालू ठेवण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे मृत्यू होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कोणतंही लक्षण नसलेले रुग्ण दवाखान्यात येत आहेत. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, असं डॉक्टर सांगतात.

कोरोनील: बाबा रामदेव यांच्याविरोधात महाराष्ट्रातील ‘या’ कोर्टात तक्रार

महाराष्ट्रात सध्या करोनामुळे ७६१० मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या अनेक रुग्णांच्या रक्तामधील ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे कमी झालेला असताना ते रुग्णालयात दाखल झाले आणि डॉक्टरांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळ मिळाला नाही, असं निरीक्षण समोर आलं आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक जण को-मोर्बेडिटी म्हणजेच हाय-रिस्क रुग्ण होते, ज्यांचं वय जास्त होतं, हायपरटेंशन, हृदयाचे आजार, मधूमेह असे आजार या रुग्णांना होते. या आजारांमुळे रोगप्रतिकारक क्षमतेवर विपरित परिणाम होतो आणि विषाणूशी लढा देण्यासाठी हे रुग्ण असमर्थ ठरतात.

करोना: पुण्यात व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा ‘हा’ आकडा चिंता वाढवणारा

राज्य आरोग्य सेवेच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या मते, ‘मृत्यू झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल झाले. या रुग्णांना दाखल होण्याच्या अगोदरच चार ते सात दिवस करोनाचा संसर्ग झालेला होता. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये कोणतंही लक्षण नव्हतं, ज्यामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचा संशयही आला नाही. यांना अचानक श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला आणि जेव्हा ते अत्यंत संवेदनशील परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं.’

lockdown : कारण नसताना घराबाहेर पडले; मुंबईत १६ हजार वाहने जप्त

अनेक रुग्णांचा रुग्णालयात येताच मृत्यू झाल्याचंही अर्चना पाटील यांनी सांगितलं. ऑक्सिजन स्तर ५० ते ६० टक्क्यांनी खालावल्याचं मृत्यूंचं मूल्यमापन करताना लक्षात आलं. जे लोक हाय रिस्कमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपला ऑक्सिजन नेहमी चेक करणं अत्यंत संवेदनशील बनलं आहे, असंही त्या म्हणाल्या.

काय आहे चिंतेचं कारण?

चिंतेचं कारण सांगताना काशीबाई नवले रुग्णालयातील डॉ. दिलीप कदम म्हणाले, ‘व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण हे ९४ ते १०० टक्के असतं आणि ते ९० टक्क्याच्या खाली आल्यास असामान्य समजावं. हा सायलेंट हायपोक्सिया असतो. यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत वेगाने कमी होतं आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. अशा रुग्णांकडून श्वास घेण्यास अडचण किंवा छातीत दुखत असल्याची तक्रार केली जाते. या सायलेंट हायपोक्सियामुळे अनेक अडचणी निर्माण होतात आणि डॉक्टरांसाठीही हा चिंतेचा मुद्दा आहे. कारण, त्याचा शोध घेणं शक्य होत नाही. यावरचा उपाय म्हणजे रक्तातील ऑक्सिजन तपासण्यासाठी ऑक्सिमीटर वापरावं.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Anna Hazare: अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला – no team this time, anna hazare will alone go on fast over farmers issue

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘टीम अण्णा’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे...

Gwalior: पत्नी ७ महिन्यांची गर्भवती होती, पती दारूच्या नशेत घरी आला अन्… – gwalior drunk husband beats to death his pregnant wife in madhya...

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहना पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्यामपूर गावात मद्यधुंद पतीने केलेल्या बेदम मारहाणीत सात महिन्यांची...

Recent Comments