Home देश Coronavirus remdesivir: करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना - coronavirus...

Coronavirus remdesivir: करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना – coronavirus update first batch of covifor remdesivir send to five state


नवी दिल्लीः करोना व्हायरसवरील जेनेरिक औषधाची (Coronavirus generic medicine) पहिली खेप सर्वाधिक प्रभावित असलेल्या पाच राज्यांना पाठवण्यात आली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि तेलंगणमधील हैदराबादचा समावेश आहे. औषधाचे २० हजार व्हायल या राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर इंदौर, भोपाळ, लखनऊ, पाटणा, भुवनेश्वर रांची, विजयवाडा, कोचीन, त्रिवेंद्रम आणि गोवा यांना पुढच्या आठवड्यात या औषधाचा पुरवठा केला जाईल.

हैदराबादमधील हेटेरो हेल्थ केअर ( Hetero) कंपनीने रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाचे जेनेरिक व्हर्जन कोविफोर (COVIFOR) नावाने बनवले आहे. आता एका आठवड्यात १ लाख व्हायल बनवण्याचे लक्ष्य हेटेरो कंपनीने ठेवले आहे. एका व्हायलची किंमत ही ५४०० रुपये आहे. एका रुग्णाला ६ व्हायलची आवश्यकता असते.

डीजीसीआयने Remdesivir बनवण्याची परवानगी सिप्ला आणि हेटेरो हेल्थ केअर कंपन्यांना दिली आहे. या औषधाचा उपयोग इमर्जन्सीमध्ये केला जातो. भारतात कोविफोर औषध उपलब्ध करणं हे कंपनीचं मोठं यश आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यावेळी आरोग्य यंत्रणेवर मोठा दबाव आहे, असं हेटेरो कंपनीनेच व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं. करोनावरील रेमडेसिवीरचे कोविफोर हे पहिले जेनेरिक औषध आहे. याचा उपयोग नवजात शिशू आणि लहान मुलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या गंभीर रुग्णांसाठी करता येऊ शकतो, असं कंपनीने म्हटलंय.

Remdesivir चे आणखी एक व्हर्जन

सिप्ला कंपनीने (Cipla) रेमडेसिवीर बनवणारी अमेरिकेतील Gilead Sciences Inc या कंपनीशी लायसन्स एग्रीमेंट साइन केलंय. यानुसार सिप्लाही हे औषध बनवेल आणि विकणार आहे. ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत कंपनीचे औषध असेल, असं सिप्लाने म्हटलंय.

Remdesivir रग्णाला लवकर बरं करतं

ट्रायलमध्ये रेमडेसिवीरचा रिझल्ट उत्तम आला. Remdesivir चा १० दिवसांचा कोर्स हा अधिक प्रभावी ठरतो, असं द न्यू इंग्लंड कर्नल ऑफ मेडिसिनने म्हटलं आहे. या औषधामुळे रुग्ण लवकर बरा होतो. या औषधाचा उपयोग हा गंभीर आणि ऑक्सिजन थेरपी गरज आहे, अशा रुग्णांसाठी करता येऊ शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

Favipiravir चे जेनेरिक व्हर्जनही उपलब्ध

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) यापूर्वी फेविपिरावीर (Favipiravir) च्या जेनेरिक व्हर्जनला मंजुरी दिलीय. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने (Glenmark Pharmaceuticals) या कंपनीला ही परवानगी दिली गेलीय. कंपनी फॅबिफ्लू (FabiFlu) नावाने हे औषध बनवते. ३४ गोळ्याची एक संपूर्ण स्ट्रीप ही ३५०० रुपयांना आहे. म्हणजे एका गोळीबीची किंमत जवळपास १०३ रुपये आहे. हे औषध माइल्ड आणि मॉडरेट सिम्प्टम्स असणाऱ्या रुगणांच्या उपचारात उयोगात आणले जाते. हे औषध हॉस्पिटल्स आणि प्रिस्क्रिप्शनवर मेडिकल स्टोअर्समध्ये मिळेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments