Home विदेश coronavirus source inquiry: करोना: अखेर चीन नमले; आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी तयार - china...

coronavirus source inquiry: करोना: अखेर चीन नमले; आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी तयार – china ‘open’ to international effort to identify corona virus source


बीजिंग: करोना संसर्गाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा भडिमार सहन करणाऱ्या चीनने आता नमते घेतले आहे. करोना संसर्गाच्या मुद्यावर चौकशी करून घेण्यास अखेर चीनने तयारी दर्शवली आहे. संसर्गाच्या मुद्यावर अमेरिकेने सातत्याने चीनवर टीका केली होती. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत याचे पडसाद उमटले होते.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी याबाबतची माहिती दिली. वांग यी यांनी चीनच्या वार्षिक संसदेच्या बैठकीत सांगितले की, करोना संसर्गाचे स्रोत पाहण्यासाठी आतंरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिकांच्या समुदायासोबत काम करण्यास चीन तयार आहे. ही चौकशी निष्पक्ष, व्यावसायिक आणि रचनात्मक पद्धतीने असली पाहिजे असेही त्यांनी म्हटले. चौकशी निष्पक्ष असणे म्हणजे तपास प्रक्रिया ही कोणत्याही राजकीय हस्तक्षेपांपासून मुक्त असली पाहिजे. सगळ्याच देशांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर सन्मान झाला पाहिजे आणि कोणत्याही निष्कर्षावरून कोणालाही दोषी ठरवण्याच्या बाबींना विरोध झाला पाहिजे. करोना संसर्गाच्या मुद्यावरून चीनची बदनामी करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा अमेरिकेचा कट अपयशी झाला असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा: ट्रम्प यांनी दावा केलेल्या ‘संजीवनी’ औषधामुळे मृतांच्या संख्येत वाढ!

करोनाच्या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सातत्याने चीनवर टीका करत आहेत. चीनमुळे जगावर हे संकट ओढावले असून त्यांनी माहिती दिली नसल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीही म्हटले आहे. करोनाचा संसर्ग हा वुहान येथील प्रयोगशाळेतून बाहेर आला असल्याचाही आरोप करण्यात येत होता. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने करोनाबाबतच्या चौकशीची मागणी केली होती.

आणखी वाचा:
‘या’ महिन्यांमध्ये होणार करोना संसर्गाचा ‘दि एन्ड’!
करोनातील बदलामुळे चीनमध्ये चिंता; नवे रुग्ण सापडलेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Recent Comments