Home महाराष्ट्र coronavirus test: करोनाच्या चाचण्या; मिस कॉलद्वारे खातरजमा - coronavirus test confirm by...

coronavirus test: करोनाच्या चाचण्या; मिस कॉलद्वारे खातरजमा – coronavirus test confirm by miss call


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाच्या चाचण्या करण्यासाठी येणाऱ्या अनेक व्यक्ती चुकीचे, अर्धवट दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक देत असल्याचे आरोग्य यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मिस कॉल देऊन या नंबरची खातरजमा करून घ्यावी, असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच चाचणी करताना कोणत्याही ओळखपत्राद्वारे पडताळणी करणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी चाचणी, पाठपुरावा व वैद्यकीय उपचार या कार्यपद्धतीचा वापर प्रभावीपणे होत आहे. मात्र करोनाची चाचणी करून घेण्यासाठी आलेले काही जण चुकीचे पत्ते, मोबाइल क्रमांक देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे चाचण्या पॉझिटिव्ह आल्या, तर त्याची माहिती फोन करून देण्यात अडचणी येत आहेत. तसेच करोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास, चुकीच्या क्रमाकांमुळे नातेवाईकांशी संपर्क साधताना रुग्णालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्य संशोधन विभागाने ‘आयसीएमआर’ने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यामध्ये कोविड शोध मोहिमेमध्ये आघाडीवर कार्यरत असलेले लक्षणविरहित आरोग्यसेवक, स्वच्छता सेवक, सुरक्षासेवक यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा कसे, याची आतपासणी आयजी अण्टीबॉडी पद्धतीचा वापर करून करण्याचे निर्देश दिले आहेत. चाचणीच्या सर्व निकालाची माहिती ईमेलद्वारे पाठवावी लागते. खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांचे निकाल हेईमेल करून कळवण्यात येतात.

चौकट एक..

रिपोर्टिंगची प्रक्रिया सुरळीत

ट्रूनॅट आणि सीबीनॅट चाचण्यांचा क्षयरोग आणि इतर संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वापर केला जातो. ही चाचणी विशिष्ट स्वरुपाचे कार्टेज वापरून केली जाते. ‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या रिअल टाइम आरटीपीसीआर, ट्रूनॅट आणि सिनॅट पद्धतीच्या चाचण्या करण्यात येतात. काही पालिका रुग्णालयांमध्ये फिव्हर ओपीडीसह करोना चाचण्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळांचे अनुभव विचारला असता डॉ. एम.नायर यांनी सांगितले की, पैसे भरून वैद्यकीय चाचण्यांची सुविधा घेण्यात येत असल्यामुळे चुकीची माहिती देण्यात येत नाही. थायरोकेअरचे प्रमुख चंद्रशेखर यांनीही आता पूर्वी असलेल्या सगळ्या तक्रारी दूर होऊन चाचण्यांसह रिपोर्टिंगची पद्धतीही आता सुरळीत झाल्याचे सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments