Home विदेश coronavirus tratment: करोनावरील उपचारासाठी 'या' औषधाचा वापर धोकादायक! - world health organization...

coronavirus tratment: करोनावरील उपचारासाठी ‘या’ औषधाचा वापर धोकादायक! – world health organization warns overuse of antibiotics for covid-19 patients


जिनिव्हा: जगभरातील २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाच्या संसर्गासमोर अनेक देश हतबल झाल्याची परिस्थिती आहे. करोनावर ठोस लस, औषध उपलब्ध नसल्यामुळे उपचारासाठी विविध रोगप्रतिकारक औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्यातील काही औषधांचा वापर धोकादायक ठरू शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

करोनाच्या उपचारासाठी अनेक देशांमध्ये अॅण्टीबायोटिकचा वापर करण्यात येत आहे. मात्र, या अॅण्टीबायोटिकच्या अतिवापराचा उलटा परिणाम होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने अॅडनॉम गेब्रेयसिस यांनी व्यक्त केली आहे. अॅण्टीबायोटिकच्या वापरामुळे इतर जीवाणूंचीच प्रतिकार शक्ती वाढत आहे. त्यामुळे अॅण्टीबायोटिक औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो आणि इतर आजार होण्याचा धोका आहे. आजारास कारणीभूत असणाऱ्या या जीवाणूंमध्ये काही विषारी घटक असतात. त्यांना अॅन्डोटॉक्सिन आणि अॅक्सोटॉक्सिन म्हटले जाते. या जीवाणूंमुळे न्यूमोनिया, क्षयरोग, ताप आदी आजार होण्याचाही धोका आहे.

वाचा: करोनाची माहिती देणाऱ्या आणखी एका डॉक्टरचा मृत्यू

औषध वापराबाबतचे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने जारी केले आहेत. हायड्रोक्सोक्लोरोक्वीन औषधाच्या वापरावर तात्पुरती बंदी आणली आहे. त्यानंतर काही देशांनी हायड्रोक्सोक्लोरोक्वीन या मलेरियावरील औषधाचा वापर करोनाबाधितांवर करणे थांबवले आहे.

आणखी वाचा:
करोनानंतर रशियन नागरीक ‘या’ हल्ल्याने बेजार
करोनाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ तीन उपाय!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments