Home विदेश Coronavirus treatment: अॅण्टीबॉडी औषधाची मानवी चाचणी सुरू; 'या' महिन्यात येणार औषध! -...

Coronavirus treatment: अॅण्टीबॉडी औषधाची मानवी चाचणी सुरू; ‘या’ महिन्यात येणार औषध! – us human trials begin for first antibody cocktail for treat and prevent covid-19


वॉशिंग्टन: करोनाच्या आजाराला अटकाव करण्यासाठी विविध कंपन्यांकडून लस, औषधे विकसित करण्यात येत आहेत. करोनाच्या विषाणूला शरीरात पसरण्यापासून रोखण्यासाठी आणि आजारावर उपचार करण्यासाठी अॅण्टीबॉडी औषध विकसित करण्यात आले आहे. या औषधाची मानवावर चाचणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती Regeneron Pharmaceuticals या कंपनीने दिली आहे. अॅण्टीबॉडी औषधाची ही अमेरिकेतील पहिली चाचणी आहे.

Regeneron Pharmaceuticals कंपनीने सांगतिले की, अॅण्टीबॉडीचे चार वेगवेगळ्या लोकांवर चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये करोनाच्या आजाराने रुग्णालयात दाखल असलेले, आजाराची लक्षणे आहेत मात्र घरीच उपचार घेत आहेत, निरोगी व्यक्ती पण आजार होण्याचा धोका आहे आणि करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तींवर या औषधाची चाचणी करण्यात येणार आहे. Regeneron कंपनीचे अध्यक्ष जॉर्ज यानकॉपुलस यांनी सांगतिले की, आम्ही एक युनिक अॅण्टी-व्हायरल अॅण्टीबॉडी मिश्रण तयार केले आहे. ज्याच्यामध्ये संसर्ग रोखणे आणि उपचार करण्याची क्षमता आहे. त्याशिवाय विषाणूचा फैलाव रोखता येणार असून सध्या ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या लसीची चाचणी यशस्वी झाल्यास सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान हे औषध उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.

वाचा: काय सांगता…मांजरीवरील औषधाने केला करोनाचा खात्मा!
वाचा: करोनावर ‘या’ प्रसिद्ध फार्मा कंपनीची लस ; पुढील महिन्यात चाचणी

Regeneronच्या संशोधकांनी दोन अॅण्टीबॉडी घेऊन त्याचा एका औषधात वापर केला. चाचणी करत असलेले औषध वयस्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, करोनाच्या संसर्गाला मात देण्यासाठी अटकाव करण्यासाठी विविध देशांतील १०० हून अधिक कंपन्या प्रयत्न करत आहेत. यातील काही करोना प्रतिबंधक लस महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. काही कंपन्यांनी आपली लस प्रभावी ठरत असल्याचा दावा केला असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीकडे त्यांनी वाटचाल केली आहे. अमेरिकेने पाच कंपन्यांच्या लसींवर विश्वास दाखवला असून त्याबाबतची महत्त्वाची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा:
गायीच्या मदतीने होणार करोनाबाधितांवर उपचार!
चीनमध्ये डिसेंबर नव्हे ऑगस्टपासूनच करोनाचा संसर्ग’; हार्वर्डचा दावाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Cyber insurance: सायबर गुन्ह्यांचे शिकार झालात; काळजी करु नका, लवकरच त्यावर मिळणार भरपाई – irda bats for cyber insurance

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावर वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांची गंभीर दखल अशा गुन्ह्यांपासून व्यक्ती आणि व्यवसाय यांना वाचवण्यासाठी तसेच यामुळे...

Ram Shinde slams Khadse: खडसेंना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; माजी मंत्र्याची टीका – eknath khadse will repent for leaving bjp, says former minister ram...

अहमदनगर: 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. मात्र खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्येजी...

Raosaheb Danve: चोरून लग्न तुम्ही करता आणि बापाला संसार चालवायला सांगता?; दानवेंची फटकेबाजी – bjp leader raosaheb danve taunt cm uddhav thackeray over farmers...

सुरेश कुलकर्णी । जालना'तुम्ही चोरून लग्न लावलं अन् बापानं संसार चालवावा अशी कशी अपेक्षा करता?,' अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र...

Recent Comments