Home विदेश coronavirus update: करोना: पाच कोटी लोक आत्यंतिक दारिद्र्यात; भूकबळींची भीती - Covid-19...

coronavirus update: करोना: पाच कोटी लोक आत्यंतिक दारिद्र्यात; भूकबळींची भीती – Covid-19 Worsening World’s Food Systems And Increasing Extreme Poverty


न्यूयॉर्क: कोव्हिड-१९ मुळे आणखी ४ कोटी ९० लाख लोक आत्यंतिक दारिद्र्यात पडणार असून, जागतिक जीडीपीमध्ये होणारी एक टक्का कपात म्हणजे आणखी लक्षावधी मुलांचा विकास थांबणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांनी दिला आहे. जागतिक अन्न सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहनही गुटेरस यांनी केले आहे.

‘तातडीने पावले टाकली नाहीत तर जागतिक अन्न आणीबाणी निर्माण होऊन त्याचा लक्षावधी मुले आणि लोकांवर विपरित परिणाम होईल,’ असा इशाराही गुटेरस यांनी दिला आहे. ‘७.८ अब्ज लोकांना खाऊ घालता येईल यापेक्षा अधिक अन्न जगात उपलब्ध आहे. पण तरीही ८ कोटी २० लाख लोक भुकेले आहेत आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या १४ कोटी ४० लाख मुलांना अन्न मिळत नाहीये. अन्न यंत्रणा अपयशी ठरली असून, कोव्हिड-१९ मुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे,’ असे गुटेरस म्हणाले. कोव्हिड-१९ मुळे अन्न सुरक्षेवर परिणाम व त्यावरील धोरण निश्चितीचे गुटेरस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘ कोव्हिड-१९मुळे चार कोटी ९० लाख लोक आत्यंतिक दारिद्र्यात पडतील. अन्न न मिळणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढणार आहे. ज्या देशांमध्ये भरपूर अन्न आहे त्या देशांतही अन्न वितरण व्यवस्था कोलमडण्याचा धोका आहे. म्हणूनच कोव्हिड-१९ मुळे जगावर होणारे विपरित परिणाम टाळण्यासाठी तातडीने कृती केली पाहिजे. देशांनी मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, वाहतूक आणि स्थानिक बाजारपेठांना पाठिंबा देण्याची गरज आहे. अन्नधान्याची मुक्त वाहतूक होईल यासाठी व्यापार मार्ग खुले ठेवले पाहिजेत. जे सर्वाधिक असुरक्षित आहेत त्यांना सर्वप्रथम मदतीचा हात मिळाला पाहिजे. अन्नप्रक्रियेतील लघुउद्योग आणि ग्रामीण व्यवसायाला रोखतेची गरज आहे, ती पूर्ण झाली पाहिजे.’

वाचा: करोनाचे थैमान: जागतिक आरोग्य संघटनेने दिली ‘ही’ कबुली

जग मंदीच्या गर्तेत

करोनाची दुसरी लाट आली नाही तरी जर मंदीच्या भयानक लाटेत आले आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय आर्थिक अहवालात देण्यात आला आहे. कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले आहेत आणि करोनाचा फटाक सर्वाधिक गरीब आणि तरुणांना बसला आहे. असमाना वाढली आहे, असे आर्थिक सहकार्य व विकास संघटनेने म्हटले आहे. करोनाने पुन्हा उसळी मारली तर जागतिक अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी घसरेल असेही संघटनेने म्हटले आहे.

आणखी वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ ट्विटने चीनचा तिळपापड!
चीनमध्ये डिसेंबर नव्हे ऑगस्टपासूनच करोनाचा संसर्ग’; हार्वर्डचा दावाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

…चहावाला निघाला सट्ट्याचा ‘बुकी’

म. टा. प्रतिनिधी, दुबई येथे सुरू असलेल्या '' सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ''ला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सत्यनारायण मुंदडा (४०, रा. सिडको)...

Suryakumar Yadav: IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले… – ipl 2020: indian head coach ravi...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

Recent Comments