Home विदेश coronavirus update: Five Eyes Spy-Alliance Countries To 'Co-Ordinate' Covid-19 Economic Response -...

coronavirus update: Five Eyes Spy-Alliance Countries To ‘Co-Ordinate’ Covid-19 Economic Response – जगातली सर्वात शक्तिशाली संस्था मैदानात; 5 देशांची चीनविरोधात वज्रमूठ?


जगातील शक्तीशाली गुप्तचर संस्थांचं नाव घेतल्यानंतर अमेरिकेची सीआयए, इस्रायलची मोसाद, रशियाची केजीबी आणि भारताची रॉ यांसारखी नावे समोर येतात. पण पंचनेत्र म्हणजेच फाइव्ह आईज ही पाच देशांची मिळून बनलेली सर्वात शक्तीशाली यंत्रणा आहे, ज्याची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन आणि कॅनडा या पाच देशांच्या गुप्तचर संस्था एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करतात आणि त्यातून ही पंचनेत्र ही शक्तीशाली संस्था काम करते. पण या संस्थेने आपल्या कामाचा आवाका आता आर्थिक समन्वयापर्यंत वाढवला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटात जागतिक वित्तीय स्थिरता टिकवण्यासाठी हे पाच देश नियमित बैठका घेणार आहेत. हे पाच देश एकत्र येण्याचं महत्त्व मोठं आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका आपली पुरवठा साखळी निश्चित करण्यासाठी एकत्र येत असल्याचं जाणकार सांगतात. म्हणजेच अमेरिकेचा थेट निशाणा चीनवर आहे. यामध्ये अर्थातच भारत, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येणार आहे. पाहा कसं असेल या पाच देशांचं धोरण आणि भारतावर त्याचा परिणाम…

​पंचनेत्रचा इतिहास आणि सध्याची पार्श्वभूमी

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आव्हानांसाठी अटलँटिक चार्टरच्या आधारावर फाइव्ह आईज देश एकत्र आले. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि कॅनडा यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या संस्थेची ताकद एवढी आहे, की संबंधित देशाच्या कायद्यांनाही ही संस्था बांधिल नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एडवर्ड स्नोडेन यांनी या संस्थेचं वर्णन पुढील शब्दात केलं होतं. ‘राष्ट्राच्या वरील ही एक संस्था आहे, जी स्वतःच्या देशातील कायद्यांनाही उत्तर देत नाही.’ २०१३ मध्ये स्नोडेनने काही कागदपत्र लीक केली होती, ज्यात समोर आलं होतं की हे पाच देश एकमेकांच्या नागरिकांवर निगराणी ठेवतात आणि त्याची माहिती एकमेकांमध्ये वाटतात, ज्यातून देशांतर्गत नियंत्रण ठेवण्यास मदत होते. याच संस्थेने आता एकत्र येत वित्तीय स्थिरतेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

​पंचनेत्रच्या ताज्या निर्णयाबद्दल जाणकार काय सांगतात?

maharashtra times

न्यूझीलंडमधील विक्टोरिया विद्यापीठातील धोरणात्मक अभ्यासाचे तज्ञ रॉबर्ट एसन यांनी ‘स्टफ’ला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, या पाच देशांनी नेहमीच सुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर एकत्र काम केलं आहे. हे नातं कधीच आर्थिक मदतीसाठी निर्माण करण्यात आलं नव्हतं. पण आता आर्थिक क्षेत्रापर्यंत विस्तार हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं ते म्हणाले. ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून व्यापारात वाद आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेही चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी उत्सुक आहे. करोनामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी सर्व देश उत्सुक आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने हीच ती वेळ असल्याचं सांगत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते सांगतात.

​हे ५ देश चीनला कसं घेरणार?

maharashtra times

सध्याच्या घडीला पंचनेत्रमधील अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह बहुतांश देश चीनच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे पुरवठा साखळी म्हणजेच चीनमधून येणाऱ्या वस्तू विविध देशातून याव्यात किंवा स्वतःच्याच देशात निर्माण व्हाव्यात यासाठी हे देश काम करणार असल्याचं जाणकार सांगतात. निर्यात ही चीनची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे चीनने काही ठराविक वस्तूंची निर्यात रोखल्यास अमेरिकेसह दिग्गज देशांना मोठा फटका बसू शकतो याची भीती या देशांना आहे.

​अमेरिकेला ही भीती

maharashtra times

अमेरिकेने चीनवर आपलं किती अवलंबत्व आहे यासाठी एक अभ्यास केला. यानुसार, अमेरिका १६ वर्गांमध्ये आणि ५ महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. यामध्ये पृथ्वीवरील विविध संसाधनांचा समावेश आहे. याशिवाय व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चा ७५ टक्के पुरवठा हा चीनमधून होतो. फोर्ब्सच्या रिपोर्टमध्येच याविषयी सांगण्यात आलं आहे. याशिवाय अमेरिकेच्या भांडवली बाजारात चीनची गुंतवणूकही प्रचंड मोठी आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही चीन अमेरिकेला टक्कर देत असल्याने ही चिंता आणखी वाढते.

​चीनला लक्ष्य करण्यासाठी पंचनेत्रचं धोरण काय?

maharashtra times

आपण चीनवर एवढे अवलंबून असू तर आपल्याला कायम भीती दाखवली जाईल, असं या पाच देशांचं म्हणणं आहे. पण हे खरंच शक्य आहे का असा प्रश्न निर्माण होतो. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया पाच देशांमध्ये चीनवर सर्वाधिक अवलंबून आहे. ऑस्ट्रेलिया विविध ५९५ वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहे, ज्यात बॉलपॉईंट पेनपासून ते औषधांचा समावेश होतो. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड (५१३ विविध वस्तू) आहे. अमेरिका ४१४, कॅनडा ३६७ आणि ब्रिटन विविध २२९ वस्तूंसाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे.

​भारत आणि पंचनेत्र

maharashtra times

पंचनेत्राच्या निर्णयामुळे भारत, जपान आणि दक्षिण कोरियाचं महत्त्व वाढणार यात शंका नाही. कारण, अमेरिकन, युरोपियन कंपन्या चीनमधून बाहेर पडतील आणि पुरवठा साखळीमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. बाहेर पडणाऱ्या कंपन्यांसाठी आकर्षित करणारी सर्वात मोठी बाजारपेठ भारतात उपलब्ध असल्याने भारताचं महत्त्व आणखी वाढतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rr vs srh: RR vs SRH: राजस्थान विरुद्ध हैदराबाद- पराभव होणार संघ IPL 2020 बाहेर – rr vs srh ipl 2020 rajasthan royals vs...

दुबई: आयपीएलचा १३व्या हंगामातील अर्ध्याहून अधिक सामने झाले आहेत. पण अद्याप कोणताही संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. स्पर्धेतील या पुढील एक...

प्रीति झिंटा: किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी प्रीति झिंटाही राहिली बायो बबलमध्ये, जाणून घ्या हा प्रकार – preity zinta went through 20th covid bio bubble test...

मुंबई- अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दुबईत आहे. तिथे राहून ती तिच्या किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमला पाठिंबा देत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा...

jio cheapest prepaid plan: Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्लान १२९ रुपयांपासून सुरू, 56GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉल – reliance jio cheapest prepaid...

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे ग्राहकांना देण्यासाठी २४ दिवसांपासून १ वर्षापर्यंत वैधता असलेले प्रीपेड प्लान आहेत. सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लानची किंमत १२९ रुपये...

Recent Comments