Home देश Coronavirus Update India: देशात करोना रुग्णसंख्या ६ लाखांवर, पाच दिवसांत १ लाखावर...

Coronavirus Update India: देशात करोना रुग्णसंख्या ६ लाखांवर, पाच दिवसांत १ लाखावर नवे रुग्ण – coronavirus update india corona cases crosses 6 lakh


नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाचे २४४२ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची एकूण संख्याही ८९ हजारांवर गेली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५५३७ नवे रुग्ण आढळले आहेत.

कोव्हीड-१९ इंडिया डॉट ओआरजीनुसार आज बुधवारी रात्रीपर्यंत करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. देशात करोनाचे एकूण ६, ०१, ९५२ रुग्ण आढळून आले. यापैकी ३,५७,६१२ जण करोनामुक्त झाले आहेत. यापैकी १७, ७८५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात सध्या २,२६,४८९ जणांवर उपचार सुरू आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी १.८० लाखाहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. यानंतर तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. या शिवाय हरयाणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये वेगाने करोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत.

देशात करोनाच्या रुग्णांची १ लाख संख्या होण्यासाठी ६४ दिवस लागले होते. तीन जूनला करोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर होती. करोना रुग्णांची तीन लाख संख्या होण्यासाठी फक्त १० दिवस लागले तर चार लाख होण्यासाठी ८ दिवस लागले. त्यानंतर आता गेल्या पाच दिवसांत करोनाचे एक लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

चिन्यांनाही असंच बाहेर करा, प्रियांका गांधींवरून मेहबूबा मुफ्तींचा सरकारला टोला

चिनी अॅपवर डिजिटल स्ट्राइकनंतर PM मोदींचा दणका, weibo अॅपला सोडचिठ्ठी

दिल्लीत २८०० हून अधिक मृत्यू

राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत २,४४२ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ८९,८०२ इतकी झाली आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांची संख्या ही २८०३ वर गेली आहे. दिल्लीत आतापर्यंत एकूण ५९, ९९२ जण करोनामुक्त झाले आहेत. राजधानी दिल्लीत २७,००७ जणांवर उपचार सुरू आहेत. १६, ७०३ जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Pimpri Chinchwad: Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड – pimpri chinchwad man vandalised vehicles after his sister love marriage

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने १२ वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयता घेऊन परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण...

manish sisodia: School Reopen News in Delhi – शिक्षक-पालकांत अजूनही करोनाची धास्ती! शाळा बंदच राहणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून काही ठराविक राज्यांत २१ सप्टेंबरपासून शाळा महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी अनेक राज्यांत आजही शाळा-महाविद्यालय...

Recent Comments