Home देश Coronavirus Update India: होम आयसोलेशनसाठी केंद्राच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी - coronavirus...

Coronavirus Update India: होम आयसोलेशनसाठी केंद्राच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी – coronavirus update india revised guidelines for home isolation cases


नवी दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारच्या या मार्गदर्शक सूचना करोनाचे माइल्ड, प्रीसिम्टेमेटिक आणि एसिम्टेमेटीक रुग्णांशी संबंधित आहेत. एचआयव्ही आणि कॅन्सरच्या रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये ठेवता येणार नाही. आता त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करावा लागले. तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना लक्षणाच्या सुरुवातीपासून १० दिवसांनी डिस्चार्ज दिला जाईल.

नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य लक्षण आणि लक्षणं दिसून न आलेल्या रुग्ण पण ज्यांना दूसरा कुठलाही आजार नाहीए तेच फक्त होम आयसोलेशनमध्ये उपचार घेऊ शकतात. पण यासाठीही डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल. होम आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर चाचणीची गरज नाही. लक्षणं दिसून येत नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या आहेत.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाला श्वास घेण्यास अडचण होत असेल, छातीत वेदना सुरू झाल्यास किंवा बोलताना त्रास होत असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. याशिवाय ६० वर्षांवरील रुग्णांवर हॉस्पिटलमध्येच उपचार करावे लागणार आहेत.

मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, मूत्रपिंड, फुफ्फुसासंबंधी रुग्णांवर हॉस्पिटलमध्येच उपचार करावे लागतील. होम आयसोलेशनमधील रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्यांपासून पूर्णपणे वेगळं राहावं लागले, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. ज्या राज्यांनी होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी या मार्गदर्शक सूचना लागू असतील.

सीमेवर शांततेसाठी चीनने नियमांचे पालन करावे, भारताने सुनावले

चीनला उत्तर देण्याची तयारी; सर्जिकल स्ट इक करणाऱ्या स्पेशल फोर्सेस लडाखमध्ये तैनात

देशात रुग्ण बरे होण्याचा दर ५९.५२ टक्के

कोविड-१९ च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सर्व स्तरातील सरकारच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. सध्या सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण १,३२,९१२ हून अधिक आहेत. कोविड -१९ रुग्णांच्या वेळेवरील रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज १०,००० हून जास्त रुग्ण बरे होत आहेत. गेल्या २४ तासांत एकूण ११,८८१ कोविड -१९ रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ३,५९,८५९ पर्यंत पोहोचली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ५९.५२ टक्के इतका झाला आहे. सध्या २,२६,९४७ सक्रिय रुग्ण असून त्या सर्वांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलीय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments