Home विदेश coronavirus updates: Coronavirus करोना: चांगली बातमी! आणखी एका लशीची मानवी चाचणी यशस्वी...

coronavirus updates: Coronavirus करोना: चांगली बातमी! आणखी एका लशीची मानवी चाचणी यशस्वी – coronavirus vaccine updates inovio claims positive results on covid-19 vaccine


वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी जगभरातून प्रयत्न विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. करोना प्रतिबंधक लसीवरही संशोधन सुरू आहे. आता आणखी एका लसीची मानवी चाचणी यशस्वी झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील बायोटेक फर्म इनोव्हिओने हा दावा केला असून लस ९४ टक्के यशस्वी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इनोव्हिओ कंपनीने आयएनओ-४८०० नावाची लस विकसित केली आहे. या लसीची चाचणी ४० जणांवर करण्यात आली आहे. ही चाचणी ९४ टक्के यशस्वी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. क्लिनिकल चाचणी दरम्यान अमेरिकेत १८ ते ५० या वयोगटातील ४० लोकांना लस देण्यात आली होती. या ४० जणांना चार आठवड्यात दोनदा लशीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर आयएनओ-४८०० लशीमुळे सर्वांच्याच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या चाचणी दरम्यान, लस टोचल्यामुळे कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आला नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

वाचा: चीनमध्ये सापडला आणखी एक विषाणू, जगभरात खळबळ

वाचा:करोनावर लस: जाणून घ्या कोणत्या लशी आहेत अंतिम टप्प्यात

इनोव्हिओ कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष केट ब्रॉडरीक यांनी म्हटले की, १० जानेवारी रोजी चीनच्या संशोधकांनी करोना विषाणूचा जेनेटिक कोड प्रसिद्ध केला होता. त्याआधारे एक सूत्र तयार करण्यात आले. ही डीएनए लस करोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनची ओळख पटवून तशाच प्रकारच्या प्रोटीनची निर्मिती करणार असून करोनाच्या विषाणूला निष्क्रिय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पाइक प्रोटीनमुळे मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होईल. लसीमुळे स्पाइक प्रोटीनची निर्मिती झाल्यास शरीर त्यालाच विषाणू समजून आणखी अॅण्टीबॉडी तयार करणार. मात्र, या प्रोटीनमुळे शरीराला कोणतेही नुकसान होणार नाही मात्र, करोना विषाणूचा खात्मा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या लशीची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरू होणार आहे.

वाचा: काळजी घ्या! ‘ही’ आहेत करोना संसर्गाची तीन नवीन लक्षणे

वाचा: WHOशोधणार करोनाचे उगमस्थान! पुढील आठवड्यात चीनमध्ये जाणार
जगभरात सध्या करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी १२० हून अधिकजण प्रयत्नशील आहेत. यामध्ये १३ लस या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये चीनमधील कंपन्यांनी विकसित केलेल्या लसींची संख्या अधिक आहे. सध्या चीनमध्ये ५, ब्रिटनमध्ये २, अमेरिकेत ३, रशिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी एक लस क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत.

वाचा: करोना महासंकटाची टांगती तलवार!; WHO ने दिला ‘हा’ इशारा
कधी येणार लस?

तीन टप्प्याात मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर संबंधित देशाच्या औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी ही लस पाठवण्यात येते. त्यानंतर या लशीशी संबंधित सर्व बाबी तपासून पाहिल्या जातात. या लसीचा मानवाच्या आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो का हे तपासून पाहिले जाते. त्यानंतरच या लसीला मान्यता देण्यात येते. या प्रक्रियेत साधारणपणे ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, करोना संसर्गाच्या थैमानामुळे या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in maharashtra: Coronavirus: करोनामुक्तांचा आकडा १५ लाखांच्या उंबरठ्यावर; राज्यात दिवाळीआधी ‘हे’ चांगले संकेत – maharashtra reports 5902 new covid19 cases 7883 recoveries and...

मुंबई: राज्यात आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ७ हजार...

LIVE: कांदा लिलाव सुरू होणार! केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना दिलासा

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

Recent Comments