Home विदेश coronavirus updates: Coronavirus चीनच्या नऊ महिने आधी 'या' देशात होता करोनाचा विषाणू!...

coronavirus updates: Coronavirus चीनच्या नऊ महिने आधी ‘या’ देशात होता करोनाचा विषाणू! – coronavirus updates coronavirus was found in spain nine months before china in the world study claim


बार्सिलोना: करोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला असल्यामुळे चीनमधूनच करोनाचा संसर्ग फैलावला असल्याची चर्चा आहे. त्यावरूनच जागतिक राजकारण ढवळून निघाले असताना स्पेनमधील बर्सिलोना विद्यापीठाने नवीन माहिती जाहीर केली आहे. चीनपेक्षा नऊ महिने आधी स्पेनमध्ये करोनाचा विषाणू असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

स्पेनमधील सांडपाण्यात करोनाचा विषाणू मार्च २०१९ मध्ये आढळला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर नऊ महिन्यांनी चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. बार्सिलोना विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, बार्सिलोनामध्ये मार्च २०१९ मध्ये सांडपाण्यातील नमुन्यात करोनाचे संसर्ग आढळले गेले. जगातील कोणत्याही भागात कोविड-१९चे रुग्ण, प्रकरण समोर येण्याआधीच या ठिकाणी करोनाचा संसर्ग झाला होता. या संशोधनातील दाव्यानुसार १२ मार्च २०१९ रोजी करोनाचा संसर्ग आढळला होता. सांडपाण्याच्या नमुन्यात विषाणू आढळले असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: करोनाबाधितांची संख्या एक कोटींवर; भारत चौथ्या स्थानी

वाचा:करोनावर लस: जाणून घ्या कोणत्या लशी आहेत अंतिम टप्प्यात

जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१९ मधील नमुन्याचा अभ्यास

या अभ्यासासाठी स्पेनच्या वेगवेगळ्या शहरातून जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान वेगवेगळ्या दिवशी जमा करण्यात आलेल्या सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील एका नमुन्यात, करोना व्हायरसचा जीनोम सापडला. या संशोधनाचे निष्कर्ष समोर आले असले तरी त्याचे अद्याप समीक्षण झाले नाही. त्यामुळे हा दावा अगदी खराच आहे असं तूर्तास म्हणता येणार नसल्याचे तज्ञ सांगतात.

वाचा: जगाला करोनाचा नव्हे तर ‘याचा’ अधिक धोका: WHO

जानेवारी २०२० मध्ये करोनाचा संसर्ग

स्पेनमध्ये करोनाचे प्रकरण फेब्रुवारीमध्ये समोर आले होते. मात्र, एका अभ्यासानुसार, जानेवारी महिन्यात सांडपाण्याच्या नमुन्यात करोनाचा विषाणू आढळला. स्पॅनिश सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ अॅण्ड सॅनिटरी एडमिनिस्ट्रेशनचे डॉ. जोन रेमन विल्लीबी यांनी सांगितले की, बार्सिलोनाच्या सांडपाण्यात फक्त एकदाच करोनाचा विषाणू आला असावा असे होऊ शकत नाही. स्पेनमध्ये करोनाचा संसर्ग स्पेनमध्ये कधी आला असावा यासाठी आम्हाला अधिक नमुन्यांचा आणि डेटाचा अभ्यास करावा लागणार आहे.

वाचा: जादूई मास्क…करोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा करणार!

वाचा: वेल डन! करोनात भारत ठरलाय जगासाठी फार्मसी

वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, स्पेनमध्ये करोनाचा संसर्ग फैलावण्यापूर्वी काही रुग्णांनी ताप आल्याची तक्रार केली होती. त्यांच्यात लक्षणे आढळली नव्हती. अशा रुग्णांवर तापाच्या औषधाने उपचार करण्यात आले. अनेक प्रकरणात मलेरिया, तापाचा आजार म्हणून उपचार करण्यात आले. करोना लक्षणांकडे योग्य प्रकारे लक्ष न दिल्यामुळे रुग्णांकडून संसर्ग फैलावला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे....

Recent Comments