Home विदेश coronavirus updates: Coronavirus 'या' देशात दररोज एक लाख करोनाबाधित आढळण्याचा धोका! -...

coronavirus updates: Coronavirus ‘या’ देशात दररोज एक लाख करोनाबाधित आढळण्याचा धोका! – us could hit 1 lakh new coronavirus cases a day warns top expert


वॉशिंग्टन: जगभरात करोनाचा हाहाकार सुरू आहे. करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. नागरिकांनी काळजी न घेतल्यास अमेरिकेत आगामी काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेत दरदिवशी एक लाख करोनाबाधित आढळतील अशी भीती वैज्ञानिक आणि करोना तज्ञ डॉ. अॅथोनी फॉसी यांनी व्यक्त केली आहे.

करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात अमेरिकेला अपयश आले असून त्यावर नियंत्रण कसे मिळवता येईल, हादेखील प्रश्न असल्याचे डॉ. फॉसी यांनी सांगितले. नागरिकांनी मास्क न घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्यास लवकरच अमेरिकेत दरदिवशी एक लाख करोनाबाधित रुग्ण आढळतील, असेही त्यांनी सांगितले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अॅण्ड इन्फेक्शियस डिजीसचे प्रमुख असलेल्या डॉ. फॉसी यांनी अमेरिकेत करोनामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत असून काळजी न घेतल्यास गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत न्यूयॉर्क, न्यूजर्सीनंतर आता कॅलिफोर्निया, टेक्सस आणि एरिजोना राज्य संसर्गाचे केंद्र झाले आहेत.

वाचा: करोना: चांगली बातमी! आणखी एका लशीची मानवी चाचणी यशस्वी

वाचा: ट्रम्प म्हणाले, चीनवर मला राग येतोय….!

डॉ. फॉसी यांनी सांगितले की, अमेरिकेत प्रशासनाच्या हातातून परिस्थिती निसटली असल्याची परिस्थिती आहे. अमेरिकेत आणखी वाईट चित्र निर्माण होणार आहे. अमेरिकेत मागील दिवसांपासून दररोज सरासरी ४० हजारहून अधिक करोनाबाधित आढळत आहेत. संसर्ग होणाऱ्या ठिकाणी करोनावर नियंत्रण आणायला हवे. करोनाला अटकाव करणाऱ्या काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात असून ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: चीनमध्ये सापडला आणखी एक विषाणू, जगभरात खळबळ

मेरिकेत करोनाबाधितांची संख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. तर, मृतांची संख्या एक लाख २५ हजारांहून अधिक झाली आहे. जगभरातील जवळपास २०० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून बाधितांच्या संख्येने एक कोटीचा आकडा ओलांडला आहे. अनेक देशांमध्ये विशेषत: आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये करोनाची पहिल्या लाटेचा जोर अद्यापही सुरू झाला नसल्याचे म्हटले जाते. करोनाच्या संसर्गावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने चीनवर टीका सुरू आहे. करोनाच्या वाढत्या थैमानानंतर ट्रम्प यांनी चीनवर रोष व्यक्त केला आहे. तर, करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती ट्रम्प यांना हाताळता न आल्यामुळे चीनच्या नावाने खडे फोडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अमेरिकन सरकारने योग्य वेळी काळजी न घेतल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jalpaiguri Truck Accident: भीषण! बोल्डरनं भरलेला ट्रक गाड्यांना धडकला, १३ जागीच ठार – west Bengal Jalpaiguri Truck Accident | Maharashtra Times

कोलकाता : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये धुक्यामुळे एक मोठा अपघात घडलाय. बोल्डर भरलेल्या एका ट्रकनं समोरून येणाऱ्या गाड्यांना धडक दिल्याचं समोर येतंय. धुपगुडी भागात...

Property Tax Bills on E-Mail: मालमत्ता कर देयके आता ई-मेलवर येणार – property tax bills on e-mail, bmc asks citizens to register on website

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमालमत्ता कराची देयके आता ई-मेलवर पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी करदात्यांनी पालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी अर्जामध्ये आपली आवश्यक ती...

Recent Comments