Home विदेश coronavirus updates: Coronavirus updates करोनाचे थैमान सुरूच; जगभरातील मृतांची संख्या २० लाखांवर...

coronavirus updates: Coronavirus updates करोनाचे थैमान सुरूच; जगभरातील मृतांची संख्या २० लाखांवर – coronavirus update more than 20 lakhs dead in due to coronavirus in world


वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरूच असून बाधितांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. जगभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वीस लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच करोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ कोटी ४० लाखांवर पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार,जगातील करोनाबाधितांची संख्या नऊ कोटी ४० लाखांहून अधिक झाली असून करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वीस लाख २२ हजार झाली आहे.

करोनामुळे अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला असून, अमेरिकेतील रुग्णसंख्या दोन कोटी ३७ लाख ५४ हजार ३७१२ इतकी झाली आहे, तर मृतांची संख्या तीन लाख ९५ हजार ७८५ इतकी आहे. त्यानंतर भारत आणि ब्राझीलमध्ये करोनाबाधितांची संख्या मोठी आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या दीड कोटींवर गेली असून, ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या ८३ लाखांवर गेली आहे. ब्राझीलमध्ये मृतांची संख्या दोन लाख नऊ हजार २९६ इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक करोनामृत्यू झाले आहेत. दरम्यान, रशियामध्ये ६० टक्के लोकसंख्येला लसीकरण पूर्ण झाले आहे.

वाचा: ‘या’ देशात करोनामुळे २१ दिवसांत ९० हजार करोना बळी?

वाचा: धक्कादायक! लस घेतल्यानंतर १३ जणांचा मृत्यू, फायजरच्या लशीबाबत प्रश्न उपस्थित

दहा कोटी नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत दहा कोटी नागरिकांचे लसीकरण करण्येच उद्दिष्ट ठेवले आहे. देशात लसीकरणाची सुरुवात अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. बायडेन २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सहकाऱ्यांशी देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत चर्चा केली.

वाचा: बापरे! आइस्क्रीमलाही झाला करोना; चीनमध्ये खळबळ

वाचा: चीनमध्ये करोनाचे पुन्हा थैमान? आठ महिन्यानंतर पहिला मृत्यू

गुटेरस यांची टीका

जागतिक समन्वय असलेल्या प्रयत्नांच्या अभावी करोना साथीचा मोठा फटका बसला आहे. याशिवाय सरकारांचा ‘व्हॅसिनॅशनलिझम’ आत्मघाती असून, त्यामुळे करोनाच्या जागतिक उच्चाटनासाठी विलंब होणार असल्याची टीका संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केली. डिसेंबर २०१९मध्ये आढळलेल्या करोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २० लाखांवर गेली असून, साथीचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम मोठा झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, लाखो लोक गरिबीत लोटले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुटेरस यांनी टीका केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments