Home विदेश coronavirus vaccine: Coronavirus 'लसीमुळे करोनाची बाधा होणारच नाही याची खात्री नाही' -...

coronavirus vaccine: Coronavirus ‘लसीमुळे करोनाची बाधा होणारच नाही याची खात्री नाही’ – coronavirus updates there is no guaranty for vaccine prevent coronavirus infection said bill gates


वॉशिंग्टन: सगळ्या जगाचे लक्ष करोनाला रोखणाऱ्या लसीवर लागले आहे. अनेक देशांमध्ये करोनाच्या विषाणूला अटकाव करणाऱ्या लसीवर संशोधन सुरू असून काही लस चाचणीच्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. मात्र, लस विकसित झाली तरी करोनाची बाधा होणारच नाही, याची खात्री देता येणार नसल्याचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीसोबत बोलताना बिल गेट्स यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बिल गेट्स यांनी सांगितले की, या वर्षाखेर अथवा वर्षाच्या सुरुवातीला करोनाची लस उपलब्ध होईल. या लसीचे दोन फायदे होणार आहेत. एक तर करोनाच्या आजारापासून बचाव करेल आणि दुसरं म्हणजे करोनाचा संसर्ग रोखला जाणार आहे. मात्र, लसीमुळे तुम्हाला करोनाची बाधा होणारच नाही, अशी खात्री देता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बिल यांनी सांगितले की, सध्या करोना प्रतिबंधक लसीची आवश्यकता आहे. अशावेळी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती, गरोदर महिलांवर चाचणी करण्यासाठी वेळ नाही. अशा परिस्थितीत योग्य, अचूक माहिती संकलित करणे हे कठीण काम आहे.

वाचा: करोनावर लस: जाणून घ्या कोणत्या लशी आहेत अंतिम टप्प्यात

जगभरात करोनाच्या वाढत्या संसर्गावर बिल गेट्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. बिल गेट्स यांनी सांगितले की, करोनाच्या महासाथीला रोखण्यासाठी चाचण्या वाढवाव्या लागणार आहेत. अनेक अमेरिकन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत करोना चाचणी अधिक होत असल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा व्हाइट हाउसचा दावा अयोग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बिल गेट्स यांच्या बिल अॅण्ड मिलिंडा गेटस फाउंडेशनच्यावतीने करोनाची लस विकसित करण्यासाठी ४० अब्ज डॉलर (जवळपास ३ लाख कोटी रुपये) खर्च करण्यात येणार आहे. अमेरिकेत करोनाचे थैमान सुरूच आहे. अमेरिकेत एकाच दिवसात सर्वाधिक ३७ हजार नवीन बाधित आढळले. एकाच दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर, २४३० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २४ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे.

वाचा: ‘ऑक्सिजन अभावी करोनाबाधित मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती’
वाचा: जादूई मास्क…करोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा करणार!
दरम्यान, ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. आतापर्यंत ऑक्सफोर्डची लस या निर्णायक टप्प्यात आली आहे. तर, अमेरिकेतील मार्डना इंक या कंपनीची लसही दुसऱ्या टप्प्यातील चाचणी करत आहे. चीनमधीलही काही कंपन्यांनी विकसित केलेली दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Cyber insurance: सायबर गुन्ह्यांचे शिकार झालात; काळजी करु नका, लवकरच त्यावर मिळणार भरपाई – irda bats for cyber insurance

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावर वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांची गंभीर दखल अशा गुन्ह्यांपासून व्यक्ती आणि व्यवसाय यांना वाचवण्यासाठी तसेच यामुळे...

Ram Shinde slams Khadse: खडसेंना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; माजी मंत्र्याची टीका – eknath khadse will repent for leaving bjp, says former minister ram...

अहमदनगर: 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. मात्र खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्येजी...

Raosaheb Danve: चोरून लग्न तुम्ही करता आणि बापाला संसार चालवायला सांगता?; दानवेंची फटकेबाजी – bjp leader raosaheb danve taunt cm uddhav thackeray over farmers...

सुरेश कुलकर्णी । जालना'तुम्ही चोरून लग्न लावलं अन् बापानं संसार चालवावा अशी कशी अपेक्षा करता?,' अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र...

Recent Comments