Home विदेश coronavirus vaccine latest update: Corona Vaccine Latest Update Know About Corona Vaccine...

coronavirus vaccine latest update: Corona Vaccine Latest Update Know About Corona Vaccine Which Vaccine In Final Stage – Coronavirus करोनावर लस: जाणून घ्या कोणत्या लशी आहेत अंतिम टप्प्यात


करोनावरील या लशी चाचणीच्या निर्णायक टप्प्यावर

सध्या या १३ लशीची चाचणी निर्णायक टप्प्यावर आहे.

१) ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca Plc (अंतिम टप्प्यातील चाचणी)

२) बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि कॅनसिनो बायोलॉजिकल इंक (दुसरा टप्पा)

३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अॅण्ड इन्फेक्शियस डिजीसेस (अमेरिका) आणि मॉडर्ना इंक (दुसरा टप्पा)

४) वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि सायनोफार्म (पहिला/दुसरा टप्पा)

५) बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स / सायनोफार्म (पहिला/दुसरा टप्पा)

६) सायनोवॅक (पहिला/दुसरा टप्पा)

७ ) बायोएनटेक/फोसन फार्मा/फिजर प्लॅटफॉर्म आरएनए (पहिला/दुसरा टप्पा)

८) नोवावॅक्स

९) चायनीझ अॅकडमी ऑफ मेडिकल सायन्स (पहिला टप्पा)

१०) इनोवियो फार्मास्युटिकल्स (पहिला टप्पा)

११) गेमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट (पहिला टप्पा)

१२) इम्पिरियल कॉलेज, लंडन (पहिला टप्पा)

१३) क्योरवॅक (पहिला टप्पा)

ऑक्सफोर्डची चाचणी अंतिम टप्पात

maharashtra times

ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca Plc.यांची करोना प्रतिबंधक लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. जगातील ही पहिली लस अंतिम टप्प्यात आली आहे. ChAdOx1 nCov-19 ही लस आता १० हजार २०६ जणांना देण्यात येणार आहे. या लशीची चाचणी ब्रिटनशिवाय दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्येदेखील होत आहे. त्याशिवाय ब्रिटनसह चार देशांमध्ये लसीचे उत्पादन सुरू झाले आहे. भारतत, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने ही लस उत्पादित करण्यात येत आहे. ही लस ChAdOx1 या व्हायरसपासून विकसित झाली आहे. हा व्हायरस सामान्यपणे येणाऱ्या सर्दीच्या व्हायरसचे एक रुप आहे. त्यामध्ये जनुकीय बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे माणसांवर त्याचा परिणाम होत नाही.

चीनमध्ये लशीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात

maharashtra times

बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि कॅनसिनो बायोलॉजिकल इंक यांनी संयुक्तरीत्या लस विकसित करत आहेत. या लसी क्लिनिकल इव्हॅल्यूशनच्या फेज २मध्ये आहे. तर, लशीचा रेग्युलेटरी स्टेट्स फेज१ मध्ये आहे. ही लस नॉन-रेप्लिकेटींग व्हायरल वेक्टर प्लॅटफॉर्मवर काम करते. त्याशिवाय, एक लस निर्णायक टप्प्यावर असल्याची माहिती चीन सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Moderna Inc ची लस चाचणी दुसऱ्या टप्प्यात

maharashtra times

अमेरिकेतील मॉडर्ना इंक (Moderna Inc)कंपनीने आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अॅण्ड इन्फेक्सियस डिजिजेसने विकसित केलेल्या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. ही लस अॅण्टी बॉडीज तयार करत असून करोनाच्या विषाणूला निष्क्रिय करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात mRNA-1273 ही लस करोनावर प्रभावी ठरू शकते, असे आढळले आहे.

वुहानमध्ये करोनाची लस

maharashtra times

चीनच्या वुहान शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. वुहानमध्ये ही करोनाला अटकाव करणाऱ्या लशीची चाचणी सुरू आहे. या लसी पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात आहेत.

– बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स / सायनोफार्म

– सायनोवॅक

– बायोएनटेक/फोसन फार्मा/फिजर प्लॅटफॉर्म आरएनए

– नोवावॅक्स

क्लिनिकल चाचणीच्या पहिल्या टप्प्यात या लशी

maharashtra times

करोनावर विकसित होणाऱ्या काही लशी पहिल्या टप्प्यात आहेत. यामध्ये लंडन येथील इम्पिरियल कॉलेजने विकसित केलेली लस चाचणी पहिल्या टप्प्यात आहे. ही लस आरएनए आधारीत आहे. एमआरएनएवर आधारीत Curevac लसदेखील चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे. त्याशिवाय, गेमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट, इनोविया फार्मास्युटिकल्स आणि चायनीझ अॅकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेची लसदेखील पहिल्या टप्प्यात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

एटीएम कार्डाची चोरी; मग दारूची खरेदी

म. टा. खास प्रतिनिधी, इंदिरानगरमधील महिला दुकानदाराचे लक्ष विचलित करीत त्यांच्या पर्समधील २० हजारांची रोकड आणि एटीएम कार्डवर डल्ला मारला. यानंतर तब्बल १७...

महाविकास आघाडी: ‘हा’ विषय बावनकुळेंना समजू शकणार नाही; गृहमंत्र्यांचा पलटवार – the power outage in mumbai is a technical matter, says anil deshmukh

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट'वरून भाजप-महाविकास आघाडी आमनेसामनेमाजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची राज्य सरकारवर टीकागृहमंत्री अनिल देशमुख यांचा बावनकुळेंवर पलटवारनागपूरः मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा...

PM Modi: pm modi : PM मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये होणार तुफानी प्रचारसभा, भाजपची रणनीती तयार – assembly election 2021 pm modi bjp campaign strategy...

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची ( assembly election 2021 ) घोषणा केली. त्यापुढच्या काही...

Recent Comments