Home विदेश coronavirus vaccine news: Coronavirus vaccine करोना: ऑक्सफर्डची लस चाचणी अमेरिकेत पुन्हा सुरू...

coronavirus vaccine news: Coronavirus vaccine करोना: ऑक्सफर्डची लस चाचणी अमेरिकेत पुन्हा सुरू होणार – coronavirus vaccine news astrazeneca oxford covid-19 vaccine trial resume in us


वॉशिंग्टन: अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. अमेरिकेत लस चाचणी सुरू करण्याबाबत नियामक मंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी सुरू असताना एका स्वयंसेवकाची प्रकृती खालावली होती. त्यानंतर ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने लस चाचणी थांबवली होती.

ऑक्सफर्ड-एस्ट्रजेनका लशीचे पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका स्वयंसेकाची प्रकृती बिघडली होती. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे कंपनीने ही लस चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. स्वतंत्ररीत्या झालेल्या चाचणीत ही लस सुरक्षित आढळल्यामुळे लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यास आली. मात्र, अमेरिकेत ही स्थगिती कायम होती.

वाचा: करोना: चीनला झटका! ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी केली ‘ही’ घोषणा
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने लस चाचणीमुळे स्वंयसेवक आजारी पडला असावा, अशी शक्यता पूर्णपणे नाकारली नाही. आता अमेरिकेत चाचणी पुन्हा सुरू झाल्यानंतर कंपनीला सर्व स्वयंसेवकांवर होणाऱ्या परिणामांची माहिती द्यावी लागणार आहे.

जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची लस चाचणी स्थगितच

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीनेही आपली लस चाचणी थांबवली आहे. चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात एका स्वयंसेवकामध्ये एक वेगळाच आजार दिसून आला. त्यामुळे चाचणी स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचीही लस चाचणी सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाचा: गुड न्यूज! भारतात दाखल होणार ‘ही’ लस; चाचणी करण्यास मान्यता

वाचा: करोना लस चाचणीत एका स्वयंसेवकाचा मृत्यू; तरीही चाचणी सुरू राहणार!
लशीमुळे करोनाचा संसर्ग थांबणार नाही?

जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात करोनावरील १५० लशींवर संशोधन सुरू आहे. तर, दुसरीकडे तज्ज्ञांनी करोनाच्या लशीवर मोठे भाष्य केले आहे. लस विकसित झाली तरी करोनाचा संसर्ग थांबणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या या विधानामुळे करोना लशीची प्रतिक्षा करणाऱ्यांना धक्का बसला आहे. ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रीक वॉलेस यांनी सांगितले की करोनाच्या संसर्गाला लशीद्वारे रोखता येऊ शकत नाही. करोनाची लस पुढील वर्षी मार्च महिन्याआधी उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लशीद्वारे आतापर्यंत फक्त कांजण्याच्या आजारावर नियंत्रण मिळवता आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : दक्षता घ्या, पुन्हा ‘लॉकडाऊन’ नकोच – be careful, don’t ‘lockdown’ again

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करण्यासाठी व्यापारीवर्गान वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. अनेक महिने सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले...

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: लॉकडाऊन काळात नोकऱ्यांवर गदा; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश – cm uddhav thackeray gave directions on job crisis

मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे हातचे रोजगार गेले आहेत. त्याचवेळी नव्याने रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच या रोजगारांच्या अनुषंगाने...

Recent Comments