Home विदेश coronavirus will end: 'या' महिन्यांमध्ये होणार करोना संसर्गाचा 'दि एन्ड'! - research...

coronavirus will end: ‘या’ महिन्यांमध्ये होणार करोना संसर्गाचा ‘दि एन्ड’! – research study predicts coronavirus will end this month


लंडन: करोनाचा संर्सग जगभरातील २०० देशांमध्ये फैलावला आहे. करोनाचा कहर कधी संपणार असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत असताना संशोधकांनी एक आशादायी बातमी सांगितली आहे. करोना संसर्गाचा ‘दि एन्ड’ कधी होऊ शकतो, याबाबत सिंगापूरच्या संशोधकांनी आपला निष्कर्ष सांगितला आहे.

करोना संसर्गामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्यामुळे काही देशांनी लॉकडाउनचे निर्बंध अटींसह शिथिल केले आहेत. करोनाच्या संसर्गासमोर जगातील अनेक देशांनी हात टेकले आहे. सिंगापूरच्या संशोधकांनी करोनाची महासाथ काही देशांमध्ये संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. सिंगापूर युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिझाइनने आपल्या गणितीय सिद्धांताने करोना संपुष्टात येण्याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रिटनमध्ये आगामी चार महिन्यात करोना संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. तर, इटलीमध्ये करोनाचा संसर्ग २४ ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात येईल. तर, अमेरिकेत ११ नोव्हेंबरपर्यंत करोनाचा संसर्ग संपुष्टात येण्याचा अंदाज आहे.

वाचा: करोनाच्या लसीचा मानवावर यशस्वी प्रयोग!
वाचा: मस्तच! अवघ्या २० मिनिटांत करोनाबाधित ओळखता येणार

करोनाच्या महासाथीच्या या शक्यतेनंतरही संशोधकांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. करोना संपुष्टात येणार असल्याच्या अंदाजामुळे लोक कदाचित अधिक निष्काळजीपणे वागण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंटर फॉर एव्हिडेंस बेस्ड मेडिसनच्या एका प्राध्यापकांनी सांगितले की, करोनाबाधित रुग्ण आणि संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर असाच राहिल्यास जून अखेरीसपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा:
कराची विमान अपघातानंतर ‘त्या’ परिसराची झाली राखरांगोळी!
…तर भारतात करोनाच्या संसर्गाने ३४ हजारजणांचा मृत्यूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress...

नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी...

Recent Comments