Home विदेश coronavurs updates: Coronavirus करोना: अमेरिकेत परिस्थिती चिंताजनक; एकाच दिवसात दोन हजार मृत्यू...

coronavurs updates: Coronavirus करोना: अमेरिकेत परिस्थिती चिंताजनक; एकाच दिवसात दोन हजार मृत्यू – coronavirus updates us just recorded more than 2,000 covid-19 deaths in a day


वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाच्या संसर्गाचे थैमान कायम असून बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी अमेरिकेत एकाच दिवसात दोन हजार करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. मे महिन्यानंतर ही आतापर्यंतची सर्वाधिक मृतांची संख्या असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. येणारे काही आठवडे अमेरिकेसाठी अधिक चिंताजनक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूशनने जानेवारी महिन्याच्या मध्यापासून दररोज सरासरी २५०० बाधितांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर, १८ डिसेंबरनंतर दररोज २३०० अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यापर्यंत चार लाख ७१ हजारजणांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी अमेरिकेत ८० हजार ६०० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाचा: करोनावर मोठा दावा! पहिला बाधित चीन नव्हे तर ‘या’ देशात!

अमेरिकेत आतापर्यंत २ लाख ५० हजार ५३७ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून, रुग्णांची संख्या १.१५ कोटींहून अधिक आहे. जगभरातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक असल्याचे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. बुधवारी एका दिवसात एक लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळले.

वाचा: करोना लस: आता ऑक्सफर्डने दिली ही चांगली बातमी!

कोव्हिडची लागण सहापट अधिक

मेलबर्न : कोव्हिड रुग्णांची जगभरातील संख्या सहा पटीने अधिक असण्याची शक्यता ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी आणि मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या पाहणीत व्यक्त करण्यात आली आहे. मार्च ते ऑगस्ट या कालावधीत १५ देशांमध्ये करोनाची लागण होण्याचा सरासरी दर ६.२ पट अधिक होता, असे पाहणीत आढळले आहे. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम आणि इटलीत करोनाची लागण होण्याच्या दराची जी नोंद झाली त्यापेक्षा अधिक दर होता, असेही पाहणीतील निष्कर्षात म्हटले आहे. इटलीत तर लागण होण्याचा दर १७ पटीने अधिक असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे. एप्रिलअखेरीपर्यंत १५ देशांमध्ये ऑस्ट्रेलियात बाधितांची पातळी चांगली होती. मात्र, ऑगस्टअखेरपर्यंत लागण होण्याचा दर पाच पटींनी अधिक असावा असे यात म्हटले आहे. युरोपातील ११ देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण कोरिया आणि अमेरिका मिळून किमान ८० कोटी लोकांना करोना झाला असावा असेही निष्कर्षात म्हटले आहे.

वाचा: गुड न्यूज! भारताकडून ‘इतक्या’ कोटी करोना लशींची अॅडव्हान्स बुकिंग

आफ्रिका खंडात २० लाख रुग्ण

आफ्रिका खंडात करोना रुग्णसंख्येने वीस लाखांचा टप्पा ओलांडला असून, दुसऱ्या लाटेत संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ५४ देशांत ४८ हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत, असे आफ्रिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vegetable sellers in mumbai: २० लाख कुटुंबे संकटात – 20 lakh families vegetable seller and workers in crisis due to discussion among people over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई नगरीला धान्य व भाजीचा पुरवठा करण्यासाठी २० लाखांहून अधिक विक्रेते, कामगार मेहनत घेतात. आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने...

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

Recent Comments