वाचा: कोरोनिलवरून बाबा रामदेव भडकले; केला ‘हा’ खुलासा
कोविड ट्रिटमेंट नाही, कोविड मॅनेजमेंट
कोरोनिल या औषधाचा उल्लेख कोविड ट्रिटमेंट असा न करता कोविड मॅनेजमेंट असा करावा असे आदेश आयुष मंत्रालयाने पतंजली आयुर्वेदला दिले असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे. पतंजली आयुष मंत्रालयाच्या या आदेशाचे पालन करत आहे, असेही बाबा रामदेव म्हणाले. कंपनी आता कोरोनिल हे करोनावरील औषध असल्याच्या आपल्या दाव्यापासून मागे हटली असली, तरी देखील या औषधामुळे मध्यम आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर या औषधाचा प्रयोग यशस्वी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या औषधाला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच या औषधाचा प्रयोग करण्यात आला आणि या औषधामुळे करोनाचे रुग्ण ७ दिवसात बरे झाले असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. पंतजलीने कोविड-१९ शी दोन हात करण्याच्या दृष्टीने चांगले काम केल्याचे आयुष मंत्रालयाने मान्य केल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
वाचा: कोरोनिलवर पतंजलीचा यू-टर्न; नोटिशीला दिले ‘हे’ उत्तर
आता आयुष मंत्रालयाचे पतंजलीसोबत कोणतेही मतभेद नाहीत. मंत्रालयाने पतंजलीला संपूर्ण देशात दिव्य कोरोनिल टॅब्लेट, दिव्य श्वासरी वटी आणि दिव्य अनु तालियाची निर्मिती करणे आणि विक्री करण्याची अनुमती दिली आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही अनुमती उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेदिक आणि यूनानी सेवा विभागाच्या स्टेट लायसेन्सिंग अथॉरिटीअंतर्गत देण्यात आली आहे.
वाचा: पतंजलीला धक्का, करोनावरील औषधाच्या जाहिराती रोखल्या