Home शहरं मुंबई Coronil: coronil: बाबा रामदेव यांना झटका; 'कोरोनिल'च्या विक्रीला महाराष्ट्रातही बंदी - home...

Coronil: coronil: बाबा रामदेव यांना झटका; ‘कोरोनिल’च्या विक्रीला महाराष्ट्रातही बंदी – home minister anil deshmukh warns ramdev on coronil, says state will not allow sale of spurious medicines


मुंबई: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेने लॉन्च केलेल्या ‘कोरोनिल’ या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी घातलेली असतानाच आता महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचं क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं होतं की नाही, याचा शोध घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असं सांगतानाच महाराष्ट्र सरकार राज्यात नकली औषधांच्या विक्रीला कदापीही परवानगी देणार नाही, हा आम्ही बाबा रामदेव यांना इशारा देत आहोत, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री होणार नसल्याने बाबा रामदेव यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Search ResultsWeb resultsकरोनासाठी नाही, खोकल्याच्या औषधासाठी …

तर करोनावरील रामबाण उपाय म्हणून कोणीही कोणत्याही औषधांचा दावा करून त्या औषधांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं राजस्थान सरकारने या आधीच स्पष्ट केलं आहे. या आधी आयुष मंत्रालयानेही बाबा रामदेव यांच्या या औषधावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. तसेच बाबा रामदेव यांच्या या औषधाच्या जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली होती. आयुष मंत्रालयाकडून या औषधाची चौकशीही करण्यात येत आहे. कुणी करोनाच्या नावावर औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकत नाही, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. तसंच आयुष मंत्रालयाच्या वैधतेनंतरच करोनावरील औषधांच्या विक्रीला परवानगी असेल, असंही केंद्राने आधीच स्पष्ट केलेलं आहे. उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणी पतंजलीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कलानगरात करोनाचा शिरकाव; ‘मातोश्री’च्या बाजूच्या बंगल्यातच सापडला रुग्ण

उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीचं हे औषध चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. खोकला, सर्दीच्या औषधांच्या निर्मितीचं लायसन्स घेऊन पतंजलीने करोनावरील औषध बनवल्याचं आयुर्वेद विभागाने म्हटलं होतं. दरम्यान, बाबा रामदेव यांनी आम्ही निर्माण केलेलं औषध हे करोनावरचंच असल्याचा दावा केला आहे. या औषधाने रुग्ण बरा होण्याचा दावाही त्यांनी केला आहे.

करोना : आयुष मंत्रालयाकडून ‘आयुष-६४’ची क्लिनिकल ट्रायल सुरूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

फसवा विकास; फसवी मंडळे!

अॅड. विलास पाटणे विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीनंतर गुजराती भाषिक प्रदेशात गुजराती भाषिक राज्याच्या निर्मितीची मागणी वाढली. पुढेमागे या भाषिक अस्मितेच्या लाटेमुळे ही दोन्ही...

Uttar Pradesh: सार्वजनिक ठिकाणी महिलेचे अश्लील चाळे; कोर्टाने सुनावली शिक्षा – uttar pradesh muzaffarnagar woman caught for obscene act in public place get two...

हायलाइट्स:उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील चार वर्षांपूर्वीचं प्रकरणमहिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करताना पकडले होतेकोर्टाने या प्रकरणात महिलेला ठरवले दोषीदोन दिवस तुरुंगवास आणि पाच हजार...

शेतकरी आंदोलन: परदेशात भारतीय समुदायात मतभेद वाढले, सिडनीत शीखांवर हल्ला – attack on sikhs in sydney amid differences in indian community over agricultural laws

मेलबर्न: भारत सरकारच्या नवा कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण होत आहे. या आंदोलनाचे पडसाद परदेशातही उमटत असल्याचे चित्र आहे....

Recent Comments