Home शहरं मुंबई Coronil: coronil : रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'ला साडेसाती; विक्री किंवा जाहिरात केल्यास गुन्हा...

Coronil: coronil : रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ला साडेसाती; विक्री किंवा जाहिरात केल्यास गुन्हा दाखल होणार – home minister anil deshmukh warns patanjali on coronil


मुंबई: करोनावरील जालिम औषध म्हणून योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घातल्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पतंजली संस्थेला सज्जड दम भरला आहे. कोरोनिलची महाराष्ट्रात जाहिरात किंवा विक्री केल्यास पतंजलीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे पतंजलीसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. (anil deshmukh warns patanjali )

कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात येत असल्याची अनिल देशमुख यांनी घोषणा केल्यानंतर भाजपने पतंजलीचा बचाव करण्यास सुरुवात केली होती. मात्र देशमुख यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पतंजलीला कोरोनिलच्या विक्रीवरून तंबीच भरली आहे. रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन करोनावर औषध निर्माण केल्याचं म्हटलं होतं. कोरोनिल या औषधामुळे करोना आजार बरा होतो, असा दावाही त्यांनी केला होता. पण हे औषध बाजारात आणताना आयुष मंत्रालय किंवा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या औषधांची क्लिनिकल ट्रायलही घेण्यात आली नव्हती. कोणतंही औषध बाजारात आणतांना संबंधित ऑथोरिटीकडून परवानगी घ्यायला हवी. पण पतंजलीने ही परवानगी घेतली नाही. पतंजलीचं औषध हे आयुर्वेदिक असल्याने त्यांनी आयुष मंत्रालयाची परवानगी घ्यायलाच हवी होती, असं सांगतानाच कोणतीही परवानगी नसलेलं कोरोनिल औषध विक्रीसाठी बाजारात आणल्यास किंवा या औषधांची विक्री केल्यास नियमानुसार पतंजलीवर गुन्हा दाखल केला जाईल, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पतंजलीचा महाराष्ट्रात कोरोनिल औषध विक्रीचा मार्ग अधिकच खडतर झाल्याचं चित्रं आहे.

‘कोरोनिल’च्या विक्रीला महाराष्ट्रातही बंदी; बाबा रामदेव यांना झटका

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं होतं. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचं क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं होतं की नाही, याचा शोध घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असं सांगतानाच महाराष्ट्र सरकार राज्यात नकली औषधांच्या विक्रीला कदापीही परवानगी देणार नाही, हा आम्ही बाबा रामदेव यांना इशारा देत आहोत, असं देशमुख यांनी म्हटलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री होणार नसल्याने बाबा रामदेव यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

करोना : आयुष मंत्रालयाकडून ‘आयुष-६४’ची क्लिनिकल ट्रायल सुरू

करोनासाठी नाही, खोकल्याच्या औषधासाठी …Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments