Home शहरं मुंबई Covid-19 cases in Maharashtra: राज्यात १९८ करोनाबाधितांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या १ लाख...

Covid-19 cases in Maharashtra: राज्यात १९८ करोनाबाधितांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या १ लाख ८० हजार २९८ – maharashtra reports 198 deaths and 5536 new covid-19 positive cases today


मुंबईः मुंबईत करोनाबाधितांची वाढती संख्या कायम राहिली असून आज राज्यात पुन्हा रग्ण संख्येनं उच्चांक गाठला आहे. दिवसभरात ५ हजार ५३६ नवीन रुग्ण आढळल्यांनी नोंद झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या आता २ लाखांच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत १ लाख ८० हजार २९८ रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (COVID-19 cases in maharashtra)

राज्यात आज १९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यापैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीत असून राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के आहे. मुंबईत आज ६९ रुग्णांचे मृत्यू झाले असून, मीरा- भाईंदर-२६, ठाणे मनपा-१७, कल्याण-डोंबिवली- ४, जळगाव-३, पुणे-३, नवी मुंबई-१, उल्हासनगर-१, भिवंडी- १, पालघर- १. वसई विरार-१, धुळे-१ आणि अकोला शहरात १ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ८,०५३ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

वाचाः दोन रुपयांच्या गोळ्यांसाठी २३ रुपये का मोजले?: भाजपचा सरकारला सवाल

राज्यात आज दिवसभरात पाच हजार ५३६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ८० हजार २९८ इतकी झाली आहे. सध्या राज्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७९, ०७५ आहे. आआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,९२,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,८०,२९८ (१८.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०८,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचाः मुंबईत जमावबंदी; काय सुरू राहणार, काय बंद; जाणून घ्या



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

anil deshmukh on arnab goswami: Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांना अटक होणार?; गृहमंत्री देशमुख यांनी दिले मोठे संकेत – will take action against arnab...

मुंबई:रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः...

housewife women: घरकामामुळे जोपासता येईना आवड – women says we are most time is spend in housework therefore not getting time for passion

म. टा. प्रतिनिधी, नाशिकस्वयंपाकघरात अधिक वेळ घालवावा लागत असल्याने आपली आवड जोपासता येत नसल्याचे मत ८४ टक्के महिलांनी नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे....

manasi naik wedding: शुभ मंगल सावधान! अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात – manasi naik ties the knot with pardeep kharera

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा...

hsc exam 2021: बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा – hsc exam 2021 maharashtra boad gives relief to those students with old subjects

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची...

Recent Comments