Home देश covid 19 cases india: देशातील करोना रुग्णसंख्या ४ लाखांवर - coronavirus update...

covid 19 cases india: देशातील करोना रुग्णसंख्या ४ लाखांवर – coronavirus update 4 lakh covid 19 cases india


नवी दिल्लीः करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे शनिवारी देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाखांवर गेलीय. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे १९ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत एकूण १३ हजारांहून अधिक नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर भारताचा क्रमांक येतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी करोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली होती. यात एका दिवसात देशात १४,५०० नवे रुग्ण आढळून आले होते. यानुसार देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ३.९५ हजारांवर गेली होती. महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूत ही तीन राज्ये मिळून करोनाचे ९९०० नवे रुग्ण आढळून आले. शनिवारी सकाळच्या आकडेवारीत या तीन राज्यांतील करोनाच्या नव्या रुग्णांच्या समावेश केल्यास देशातील एकूण रुग्णसंख्या ४ लाखांवर जाते.

महाराष्ट्रात शनिवारी ३८७४ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत ३६३० तर तामिळनाडूत २३९६ नवे रुग्ण आढळून आले. आता रविवारी सकाळी यासंदर्भात अधिक स्पष्टपणे आकडेवारी जाहीर केली जाईल.

करोनावर आले हे औषध, गोळीची किंमत १०३ रुपये

दिल्लीत किती रुग्ण?

दिल्लीत करोना रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. दिल्लीत एका दिवसात ३६३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार दिल्लीतील करोना रुग्णांची एकूण संख्या ५६७४६ इतकी झाली आहे. दिल्लीत करोनाने आतापर्यंत २११२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनामुक्त झालेल्या ७७२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत सध्या २३३४० जणांवर उपचार सुरू आहेत.

अजब-गजब : व्हेन्टिलेटर हटवून कूलर सुरू केला, रुग्णाचा मृत्यू!

तामिळनाडूत किती रुग्ण?

देशात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण तामिळनाडूत आहेत. तामिळनाडूत २३९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या ५६८४५ इतकी झाली आहे. तामिळनाडूत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोनाने एकूण ७०४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुक्त झालेल्या ३१३१६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात २४८२२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

Recent Comments