Home शहरं अहमदनगर covid 19 positive: आजीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच नातवाने ठोकली धूम - one...

covid 19 positive: आजीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच नातवाने ठोकली धूम – one covid 19 positive patient found in nagar


अहमदनगर: आजीचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आपल्यालाही क्वॉरंटाइन व्हावे लागेल या भीतीने या महिलेच्या नातवाने घरातून धूम ठोकली. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने या तरुणाला पोलिसांनी पकडले असून त्याला आरोग्य विभागाच्या हवाली केले आहे.

नेवासा तालुक्यात दीड महिन्यानंतर रविवारी सकाळी करोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. कल्याण येथून आलेल्या ६० वर्षीय महिलेचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. कल्याण येथून २० मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आल्यानंतर तिला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. २२ मे रोजी तिला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक तपासणी करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी तिचा अहवाल आला असता संबंधित महिलेला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात कोणकोणत्या व्यक्ती आल्या आहेत, यांचा शोध घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली. त्यानुसार आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा कामाला लागली.

हे सरकार पोकळ पॅकेजची घोषणा करणारे नाही: उद्धव ठाकरे

मात्र, त्याचवेळी महिलेच्या नातवाने घरातून धूम ठोकली. तो गावातील स्मशानभूमी रोडच्या दिशेने पळत सुटला. त्यामुळे आरोग्य अधिकारी आणि पोलिसांची तारांबळ उडाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात एकच बोंब झाली. ग्रामस्थांनी स्मशानभूमी रोडच्या दिशेने धाव घेत या तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलीस आणि स्थानिकांनी या तरुणाला पकडून आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाली केलं. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची तपासणी करण्यात येणार आहे.

Live: संकटकाळात कुणीही राजकारण करू नये- CMSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Recent Comments