Home शहरं मुंबई covid 19 positive cases in mumbai: मुंबईत आज करोनाचे १३६ बळी तर,...

covid 19 positive cases in mumbai: मुंबईत आज करोनाचे १३६ बळी तर, १ हजार १९७ नवे रुग्ण आढळले – 136 deaths and 1197 new covid 19 positive cases reported in mumbai


मुंबईः मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज करोनाचे ११९७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं मुंबईतील एकूण करोना रुग्णांचा आकडा ६५ हजार २६५वर पोहोचला आहे. तर, करोनामुळं आज १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, आज विविध रुग्णालयातून ६१० जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत ३२ हजार ८६७ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. तर एकूण अॅक्टिव्ह रुग्ण २८ हजार ८३९ आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ५० टक्के आहे. तर, करोना दुपटीचा वेग २.०५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत आज दिवसभरात २ लाख ८३ हजार ११९ करोनाच्या चाचण्या करण्यत आल्या आहेत.

वाचाः ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्तीचं राजू शेट्टी यांना रक्तानं पत्र

आज नोंदवलेल्या १३६ मृत्यूंपैकी ९२ जणांना दीर्घकालीन आजार होते. तर, ९४ रुग्ण पुरूष व ४२ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या ९ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. तर, ७६ जण ६० वर्षांवर होते. तर उर्वरित ५१ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. करोनामुळं आत्तापर्यंत ३ हजार ५५९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

वाचाः महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त सभा सोडून निघाले

मुंबईत करोनाचा आकडा वाढत असला तरी धारावीत मात्र करोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. आज दिवसभरात धारावीत करोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. तधारावीतील एकूण रुग्णसंख्या २१५८ झाली असून आतापर्यंत ७८ रुग्ण दगावले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments