मुंबईः राज्यात आज करोना संसर्गामुळे १६० जणांचा मृत्यू झाला तर ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा हा नवा उच्चांक ठरला आहे. सध्या राज्यात ५८ हजार ०५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.०४ टक्के एवढा असून आज १३८० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ६४ हजार १५३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू पुढीलप्रमाणे :
वाचाः मुंबईत आज करोनाचे १३६ बळी तर, १ हजार १९७ नवे रुग्ण आढळले
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ०९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचाः ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्तीचं राजू शेट्टी यांना रक्तानं पत्र
मुंबईत आज करोनाचे ११९७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं मुंबईतील एकूण करोना रुग्णांचा आकडा ६५ हजार २६५वर पोहोचला आहे. तर, करोनामुळं आज १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.