Home शहरं पुणे covid 19 test: करोना चाचणीसाठी१ लाख अँटीजेन किट - one lakh antigen...

covid 19 test: करोना चाचणीसाठी१ लाख अँटीजेन किट – one lakh antigen kits for corona testing


म. टा. प्रतिनिधी, पुणे

लक्षणे नसलेल्या करोना संशयितांच्या तपासणीसाठी एक लाख अँटीजेन किट खरेदी करण्याची ऑर्डर पुणे महापालिकेने बुधवारी दिली. पुढील काही दिवसांत ही किट उपलब्ध झाल्यानंतर शहरातील चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढेल, असा दावा पालिकेने केला आहे. या चाचणीमुळे अवघ्या २० ते ३० मिनिटांत ‘कोव्हिड-१९’चा अहवाल प्राप्त होणार असल्याने सध्याचा विलंब टळणार आहे.

महापालिकेने गेल्या काही दिवसांत संशयितांच्या तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. तरीही, प्रयोगशाळांची संख्या कमी असल्याने संशयितांचे अहवाल मिळण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे सौम्य लक्षणे आढळणाऱ्या किंवा अजिबातच लक्षणे नसली, तरी करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीसाठी अँटीजेन टेस्ट करण्यास ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) परवानगी दिली आहे. त्यानुसार स्थायी समितीने मंगळवारी एक लाख किट घेण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी प्रति किट साडेचारशे रुपये यानुसार साडेचार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. ही मान्यता प्राप्त होताच ‘आयसीएमआर’ने प्रमाणित केलेल्या कंपनीकडून एक लाख किट खरेदी करण्याची ऑर्डर पालिकेने दिल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

अँटीजेन किट्समुळे संशयितांच्या तपासण्यांची संख्या वाढणार आहे. त्याशिवाय ३० मिनिटांमध्ये या चाचण्यांचा अहवाल मिळणार असल्याने त्यानुसार रुग्णांना विलगीकरणात ठेवणे किंवा त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या संशयितांपर्यंत पोहोचणे शक्य होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

खासगी प्रयोगशाळांशी करार

गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील चाचण्यांची (स्वॅब टेस्ट) संख्या वाढविण्यात आली असली, तरी अद्यापही हे प्रमाण कमी असल्याने खासगी प्रयोगशाळांशी करार करून चाचण्या वाढविण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ‘आयसीएमआर’ मान्यताप्राप्त लॅबमध्ये करोनाची चाचणी केल्यास २२०० रुपये आणि घरी येऊन चाचणी केल्यास २८०० रुपयांच्या दरांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रासने यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

Recent Comments