Home शहरं मुंबई Covid Centre Scam: गोरेगावच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; भाजपनं आकडेवारीच दिली -...

Covid Centre Scam: गोरेगावच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; भाजपनं आकडेवारीच दिली – mumbai: bjp alleges scam in nesco covid centre at goregaon


मुंबई:गोरेगाव येथील नेस्को मैदानावर करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या भव्य कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या तब्बल २३ वस्तूंची ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेनं गुपचूप काढली असून त्यात तब्बल सहा कोटींचा घोटाळा असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. (Scam in Nesco Covid Centre)

वाचा: ‘राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आलीय, पण लक्षात ठेवा…’

भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. कोविड सेंटरचं काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचं महापालिकेनं सुरुवातीला सांगितलं होतं. कोविड सेंटरची वर्क ऑर्डर मिळवण्यात यशस्वी झालेल्या रोमेल बिल्डरनं स्वत:च्या वेबसाइटवरही सीएसआर फंडातून आपण हे काम करत असल्याचं म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात महापालिकेनं त्यासाठी ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर दिली आहे, असा दावा कोटेचा यांनी केला. कोविड सेंटरमधील २३ वस्तूंची ही वर्क ऑर्डर आहे. त्यातील प्रत्येक वस्तूसाठी महापालिकेनं मोजलेले भाडे आणि प्रत्यक्षात विक्रीसाठी लागणारे पैसे यांची तुलनात्मक आकडेवारीच कोटेचा यांनी दिली.

वाचा: पडळकरांच्या पवारांवरील टीकेबाबत शिवसेनेला ‘ही’ शंका

कोटेचा यांनी दिलेली माहिती अशी…

कोविड सेंटरसाठी प्लास्टिकच्या एक हजार खुर्च्या घेण्यात आल्या आहेत. या खुर्च्यांचं ९० दिवसाचं निव्वळ भाडं साडेचार लाख ठरलं आहे. मात्र, ह्याच खुर्च्या साडेतीन लाख रुपयांत विकत मिळतात.

लाकडाचे १५० टेबल सव्वा दोन लाख रुपयांत मिळाले असते. त्यासाठी महापालिकेनं अवघ्या ९० दिवसांसाठी पावणेसात लाख रुपये भाडं मोजलं आहे.

सेंटरमधील २ हजार उभ्या पंख्यांसाठी १ कोटी ८० लाख भाडे दिले जाणार आहे. हेच पंखे अॅमेझॉनवर ७० लाखांत विकत मिळाले असते.

दोन हजार प्लग पॉइंटचे ४५ हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. हेच प्लग पॉइंट लॅमिंग्टन रोडवरून अवघ्या ६ लाख रुपयांत विकत मिळाले असते.

कोविड सेंटरमध्ये ८० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातील प्रत्येक कॅमेऱ्यासाठी दिवसाला ८०० रुपये भाडे ठरलेले आहे. त्यासाठी ५७ लाख ६० हजार रुपये खर्च होणार आहेत. हेच कॅमेरे चिनी बनावटीचे घेतल्यास एक कॅमेरा हजार ते १५०० रुपयांना पडतो. तर, कोरियन बनावटीचा सर्वोत्तम कॅमेरा १० हजार रुपयांत मिळतो. म्हणजे, अवघ्या ८ लाखांत ८० कॅमेरे विकत घेता आले असते.

प्रति लिटर पाण्यामागेही बिल्डरला २५ रुपये मोजावे लागतात

कॉमनवेल्थसारखा घोटाळा

खर्चाची तुलनात्मक आकडेवारी पाहिल्यास महापालिकेनं रोमेलला दिलेल्या ११ कोटींच्या वर्क ऑर्डरची खरी किंमत केवळ पावणे चार कोटी रुपये आहे. यात सहा ते सव्वा सहा कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. शिवाय, पुढील तीन महिन्यांसाठी हे कंत्राट वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजेच, १२ कोटी रुपयांचा घोळ यात अपेक्षित आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेल्या घोटाळ्यासारखाच हा घोटाळा आहे, असं कोटेचा यांनी म्हटलं आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव, महापालिका आयुक्त व मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिल्याचं कोटेचा यांनी सांगितलं. रोमेल बिल्डरचे सर्व पेमेंट थांबवून संबंधित प्रकरणाची चौकशी करावी व भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाचा: ‘आजारी असताना बहिणीनं फोन केल्याचा आनंद वाटला’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments