Home शहरं मुंबई COVID hospital: टाटा ट्रस्टकडून राज्यात करोना रुग्णालये - tata's covid hospital in...

COVID hospital: टाटा ट्रस्टकडून राज्यात करोना रुग्णालये – tata’s covid hospital in sangli and buldhana to be ready soon


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

टाटा ट्रस्टतर्फे राज्यात सांगली आणि बुलढाणा येथील दोन सरकारी रुग्णालयांच्या इमारतींमध्ये सुधारणा करून त्याठिकाणी कोविड-१९ उपचार केंद्रे विकसित करण्यात येत आहेत. या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणारे रुग्ण आणि बाह्य रुग्ण यांना देण्यात येणाऱ्या उपचार सुविधा केवळ करोनादरम्यान नाहीतर कायमस्वरूपी मिळतील. अलीकडेच रतन एन टाटा यांनी, ‘आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे,’असे निवेदन जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सांगली (५० बेड्स) आणि बुलढाणा (१०६ बेड्स) येथे ही रुग्णालये उभारली जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयामध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठीच्या सेवा, छोटी ऑपरेशन थिएटर, सामान्य पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, डायलिसिस सुविधा, रक्त साठवणी सुविधा आणि टेलिमेडिसिन युनिट अशा क्षमता उपलब्ध होतील. या रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी टाटा ट्रस्ट कर्करोग उपचार सुविधा निर्माण करण्यातील आपल्या अनुभवांचा वापर करत आहे. तसेच सेवा पुरवठादारांनाही या कामासाठी जोडण्यात आले आहे. या रुग्णालयांचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड करत असून डिझाइन एडिफीस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे. सर्व उपकरणे आघाडीच्या उत्पादकांकडून घेतली जात आहेत.

भारताच्या कोविड-१९ लढ्यामध्ये मदतीसाठी टाटा ट्रस्टकडून हाती घेतला गेलेला हा तिसरा उपक्रम आहे. टाटा ट्रस्टने राज्य सरकारांना आणि वेगवेगळ्या रुग्णालयांना मदत म्हणून व्यक्तिगत सुरक्षा साधने पुरवण्यास आधीच सुरुवात केली आहे. यामध्ये कव्हरऑल्स, एन९५/केएन९५ मास्क्स, सर्जिकल मास्क्स, हातमोजे आणि गॉगल्स यांचा समावेश आहे. आजवर जवळपास २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना टाटा ट्रस्ट तर्फे सुरक्षा साधने पुरवली गेली आहेत. ग्रामीण भागांमध्ये कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने आखून दिलेल्या आरोग्य उपाययोजनांचे पालन केले जावे, यासाठी टाटा ट्रस्टने संपूर्ण देशभरात हे विशेष जागरुकता अभियान हाती घेतले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Vaccination: Corona Vaccination: राज्यात आज ३५ हजार ८१६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण, धुळ्यात १४४% लसीकरण – 35 thousand 816 employees were vaccinated in the state...

मुंबई: राज्यातील एकूण ४७७ केंद्रांवर आज तब्बल ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले. राज्यात आज...

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

Recent Comments