Home महाराष्ट्र Covid patient travel mumbai to ahmednagar: Covid 19: भयानक प्रकार! करोना पॉझिटिव्ह...

Covid patient travel mumbai to ahmednagar: Covid 19: भयानक प्रकार! करोना पॉझिटिव्ह रुग्णाला टेस्ट रिपोर्टसह मुंबईहून नगरला पाठवले – medical officers from mumbai sent covid positive patient to ahmednagar


म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर शहरातील सारसनगर येथे सापडलेला ५८ वर्षे करोना बाधित रुग्णाचा अहवाल हा मुंबईमध्येच पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यानंतरही या रुग्णाला केवळ हातावर शिक्का मारून नगरला पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नगरचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी याला दुजोरा दिला आहे.

Live: राज्यात आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

नगरच्या सारसनगर भागांमध्ये ५८ वर्षीय व्यक्ती करोना बाधित आढळून आलेला आहे. ही व्यक्ती नगरच्या सारसनगर भागांमध्ये राहत आहे. मात्र, मुंबई येथे संबंधित व्यक्तीला कर्करोगावर उपचार करण्यासाठी नेले होते. तेथे त्यांची करोना चाचणी करण्यात आलेली होती. त्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, तिथेच उपचार सुरू करण्याऐवजी त्याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला पुन्हा नगर येथे पाठवण्याचा निर्णय घेतला व त्याच्या हातावर शिक्का मारून त्यांना नगर येथे पाठवण्यात आले.

वाचा: निसर्ग वादळग्रस्त लेप गावानं दाखवली प्रकाशाची वाट

संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे येथील प्रशासनाला कळवण्यात आले . त्यानुसार प्रशासनाने आज नगरमध्ये संबंधित व्यक्ती आला असून तो करोना बाधित असल्याचे जाहीर केले व त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र यानिमित्ताने पॉझिटिव्ह पेशंट मुंबईवरून नगरमध्ये येतोच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भामध्ये नगरचे नोडल ऑफिसर डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याशी संपर्क केला असता, ‘संबंधित रुग्णाचा करोना पॉझिटिव्ह अहवाल हा मुंबई मध्येच पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्याला नगरला पाठवण्यात आले असून हा रुग्ण सोबत स्वतःचा करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल घेऊन आला होता. आम्ही त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत,’असे सांगितले. मात्र तो नगरला कसा आला ? यासंदर्भात त्यांनी बोलण्यास नकार दिला.

वाचा: हा तर भारताचा विजय; उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रियाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Deshmukh on Ambani Bomb Scare Case: ‘अँटिलिया’बाहेरील स्कॉर्पिओचं गूढ वाढलं; ATSकडे तपास, ‘ही’ मागणी फेटाळली – ambani bomb scare case investigation handed over...

हायलाइट्स:मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एटीएसकडे.कारमालकाच्या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महत्त्वाची घोषणा.एनआयएकडे तपास देण्याची विरोधी पक्षाची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.मुंबई:...

LIVE : उदयनराजेंच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला राज ठाकरेंसह दिग्गजांची हजेरी | Coronavirus-latest-news

11:32 pm (IST) भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे भाचे अतिशराजे पवार यांचा विवाह सोहळा नाशिकमध्ये पार पडला....

Recent Comments