Home शहरं पुणे Covid positive woman: संतापजनक! महिलेच्या मृत्यूनंतर तिला अॅडमिट करण्यासाठी रुग्णालयाचा फोन -...

Covid positive woman: संतापजनक! महिलेच्या मृत्यूनंतर तिला अॅडमिट करण्यासाठी रुग्णालयाचा फोन – call from hospital to admit covid positive woman after death


पिंपरी : करोनाच्या अँटीजेन तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडलेल्या महिलेचा दहा दिवसांनी मृत्यू झाला. यानंतर त्या महिलेचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागणार असून त्यांना नेण्यासाठी येत असल्याचा फोन महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला करण्यात आला. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा एका कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. रुपीनगर तळवडे येथील रहिवासी कमल पांडुरंग धुकटे ( वय ५९) यांनी १ सप्टेंबर रोजी पालिकेच्या यमुनानगर येथील रुग्णालयात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली. अँटीजेनचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु, दहा दिवसांनंतरही आरटीपीसीआरचा अहवाल आला नाही. त्रास होऊ लागल्याने तीन दिवसांपूर्वी धुकटे यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, धुकटे यांचे अंत्यविधी करून घरी दुःखात असलेल्या त्यांच्या कुटुंबाला महापालिकेने दुसऱ्या दिवशी फोन करत कमल धुकटे यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणार असून त्यांना नेण्यासाठी येत असल्याचे सांगितले.

करोना: पुन्हा २२ हजार रुग्णांची नोंद; बळींचा ‘हा’ आकडा धक्कादायक

कमल धुकटे यांचा मृत्यू झाला असताना त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी येत असल्याचा फोन महापालिकेने केल्याने हे कुटुंब संतापले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अशा प्रकारे फोन प्रशासनाने केल्याने धुकटे यांच्या मुलाला मोठा धक्का बसला आहे. करोना रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. नागरिकांना पाच-पाच दिवस अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे देखील सांगितले जात नाही. परिणामी ऐनवेळी त्रास होऊ लागल्यावर रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. महापालिकेकडून मिळालेल्या या प्रकारच्या वागणुकीबद्दल हे कुटुंब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे अन्य नातेवाईकांनी सांगितले असून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

चांगली बातमी! करोनावरील ऑक्सफर्ड लसीची चाचणी सुरू, भारतात प्रतीक्षा

१०५ वर्षीय आज्जीबाईंची करोनावर मात; घरीच घेतले उपचारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik: Nashik: कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार – nashik woman sexually assaulted on pretext of career in modeling

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मॉडेलिंगमध्ये करिअरच्या भूलथापा देत एकाने गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी अत्याचार करून व अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत...

Corona Cases in Aurangabad: coronavirus – तीन मृत्यू, १३३ नवे बाधित – aurangabad reported 133 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील तीन बाधितांचा गुरुवारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला, तर १३३ नवे बाधित आढळले. त्याचवेळी ३३६ बाधित (शहरः २५६, ग्रामीणः...

Recent Comments