Home शहरं पुणे credit-debit card fraud: डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे 'अशी' होतेय फसवणूक; 'ही' काळजी घ्या...

credit-debit card fraud: डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ‘अशी’ होतेय फसवणूक; ‘ही’ काळजी घ्या – credit debit card fraud how you can avoid it


पुणे : डेबिट किंवा क्रेडिट कार्डांची माहिती चोरून आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांत गेल्या सहा महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांमध्ये शहरात अडीच हजार कार्ड फसवणुकीचे गुन्हे घडले आहेत. यात अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. डेबिट, क्रेडिट कार्डांची माहिती चोरून क्लोन करणे, कार्डाची माहिती खातेदाराला विचारून पैसे काढणे आदी प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

सरकारकडून नोटाबंदीनंतर नागरिकांनी डेबिट, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. डेबीट, क्रेडिट कार्डचा (प्लास्टिक मनी) मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला. डेबिट, क्रेडिट कार्डधारकांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन त्यांना सायबर चोरटे सहज फसवू लागले आहेत. बँके अधिकारी बोलत असल्याचे सांगून कार्डाची माहिती चोरांकडून विचारली जात आहे. काही वेळा कार्ड बंद पडण्याची भीती दाखवून नागरिकांकडून कार्डाची विचारली जाते. बँकेतील अधिकारी असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांचा विश्वास बसतो आणि ते सर्व माहिती सांगतात. त्यानंतर काही वेळातच कार्डधारकांचे बँक खाते रिकामे झाल्याचा मेसेज येतो. त्यानंतर संबंधित नागरिकाला फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मात्र, तोवर फार उशीर झालेला असतो. अलीकडे डेबिट, क्रेडिट कार्डाचे क्लोनिंग करून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढले जात आहेत. त्याचप्रमाणे बँकेचा डेटा हॅक करून अथवा सायबर हल्ला करून पैसे लुबाडले जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पुणे शहरात गेल्या वर्षभरात डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीचे दोन हजार ७०० गुन्हे घडले होते. त्यामध्ये एक हजार ८१५ गुन्ह्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर केला गेला होता. यातील ९०० गुन्हे डेबिट, क्रेडिट कार्डांचा डेटा चोरून करण्यात आले होते. मात्र, यंदा पहिल्या सहा महिन्यांतच अडीच हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात डेबिट, क्रेडिट कार्डाचा गैरवापर करून दोन हजार ७१ गुन्हे घडले होते. तर, डेबिट, क्रेडिट कार्डांची माहिती चोरून ५१७ गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांत अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यापैकी काही पैसे सायबर सेलने परत मिळवून दिले आहेत. कार्डाचा ओटीपी शेअर केल्याने झालेल्या फसवणुकीचे २३८ गुन्हे आत्तापर्यंत दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘प्लास्टिक मनी’चा वापर करताना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याची वेळ आली आहे.

डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे झालेले गुन्हे

वर्ष २०१९ – गुन्हे – २,७५१

वर्ष २०२०- गुन्हे २,५८८ (जूनअखेर)

डेबिट, क्रेडिट कार्डधारकांनो लक्षात ठेवा

– कोणत्याही व्यक्तीला आपल्या कार्डाची माहिती देऊ नये

– बँक कधीही तुमच्या कार्ड किंवा खात्याची माहिती विचारत नाही

– पासवर्ड सतत बदलणे आवश्यक; तसेच, त्यात विविधता असावी.

– कार्डावरील सीव्हीसी क्रमांक व ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका.

– हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला पासवर्ड सांगू नये

– कार्डवर पासवर्ड लिहून ठेवू नये

– कार्ड स्वाइप करताना समोरच्या व्यक्तीच्या हालचालींवरही नजर ठेवा

– पेट्रोल पंपावर कार्डाचा वापर करताना काळजी घ्यावी

– स्वाइप मशिनमध्ये पिन नंबर टाकताना दुसरा हात स्वाइप मशिनवर ठेवा, जेणेकरून तुमचा पिन समोरच्याला समजणार नाही,

– कार्ड चोरीला गेल्यास त्वरित बँकेला कळवून कार्ड ब्लॉक कराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments