Home क्रीडा Cricket: खूष खबर... चाहत्यांना आता पाहता येणार 'हे' क्रिकेटचे सामने - fans...

Cricket: खूष खबर… चाहत्यांना आता पाहता येणार ‘हे’ क्रिकेटचे सामने – fans will be allowed inside stadium whenever t-20 world cup is held: cricket australia interim ceo


क्रिकेट चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. चाहत्यांना आता स्टेडियममध्ये जाऊन सामन्यांचा आनंद घेता येऊ शकतो. जर संघांना क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते, तर चाहत्यांही सामना पाहायला दिले पाहिजे, असा निर्णय आता घेण्यात आला आहे.

करोना व्हायरसमुळे क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. कारण करोनामुळे सध्याच्या घडीला सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता क्रिकेट स्पर्धा कधी सुरु होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहता येणार नाहीत, यामुळे चाहते नाराज झाले होते. पण आता या निर्णयामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता येणार आहे.

क्रिकेट स्टेडियम

भारतामध्ये सध्याच्या घडीला क्रिकेट सुरु करण्यात आलेले नाही. क्रिकेटपटूही सध्या सराव करताना दिसत नाहीत. पण आयपीएल खेळवण्यासाठी मात्र बीसीसीआयॉने चांगलीच कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण आयपीएल होणार की नाही, हे ट्वेन्टी-२० विश्वचषकावर अवलंबून असणार आहे. जर विश्वचषक रद्द झाला तर आयपीएल खेळवले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये स्थानिक क्रिकेट सुरु करण्याच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील वातावरण सुधारत आहे. त्यामुळे विश्वचषक खेळवला जाऊ शकतो, असेही म्हटले जात आहे. आयसीसी विश्वचषकाबाबतचा निर्णय पुढच्या महिन्यात घेणार आहे. पण जर विश्वचषक खेळवण्याचा निर्णय झाला तर चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊ सामना पाहण्यासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.

maharashtra times

क्रिकेट

ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले की, ” जर विश्वचषकासाठी १५ संघांना ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते, तर तुम्ही चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे विश्वचषक खेळवला जात असताना चाहत्यांनाही स्टेडियममध्ये जाऊ सामना पाहण्याची परवानगी द्यावी लागेल.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Deshmukh on Ambani Bomb Scare Case: ‘अँटिलिया’बाहेरील स्कॉर्पिओचं गूढ वाढलं; ATSकडे तपास, ‘ही’ मागणी फेटाळली – ambani bomb scare case investigation handed over...

हायलाइट्स:मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एटीएसकडे.कारमालकाच्या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महत्त्वाची घोषणा.एनआयएकडे तपास देण्याची विरोधी पक्षाची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.मुंबई:...

Recent Comments