Home महाराष्ट्र Curfew in Mumbai : मुंबईत पुन्हा संचारबंदी लागू; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय...

Curfew in Mumbai : मुंबईत पुन्हा संचारबंदी लागू; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय – 144 Imposed In Mumbai Till 15 July


मुंबई: लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईकरांनी गर्दी सुरू केल्याने मुंबईत पुन्हा एकदा कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याचाच अर्थ मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली असून मुंबईकरांना आता कुठेही गर्दी करता येणार नाही. १५ जुलैपर्यंत हा संचारबंदी आदेश लागू असणार आहे. फक्त काही अटी आणि शर्तींवर धार्मिक स्थळांना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.

पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि पोलीस अधिकारी प्रणय अशोक यांनी हे बंदी आदेश काढले आहेत. मुंबईत आजपासून १५ जुलैपर्यंत रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. या संचारबंदीमधून केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नागरिकांना यामधून वगळण्यात आले आहे. इतर नागरिकांसाठी ही संचारबंदी असणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अशावेळी गर्दी करण्यास किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव आसेल. धार्मिक स्थळांना काही अटी आणि शर्तींवर संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे, असं ते म्हणाले. मुंबई पोलिसांनी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या संचारबंदीमधून केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नागरिकांना यामधून वगळण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच घराबाहेर पडावं, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

ठाणे परिसरात कहर; पुन्हा लॉकडाउनची मात्रा!

दरम्यान, मुंबईत करोना रुग्णांची संख्या ७७ हजार ६५८वर गेली आहे. तसेच करोनाने मुंबईत आतापर्यंत ४ हजार ५५६ लोक दगावले आहेत. तरीही मुंबईकर विनाकारण गर्दी करत असून वाहने घेऊनही रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मस्तच! करोनाला हरवून ९० वर्षांच्या आजीबाई परतल्या घरी

संचारबंदीतून या गोष्टी वगळल्या

>> अन्न, भाजीपाला, दूध पुरवठा, रेशन, किराणा दुकान यांना संचारबंदीतून सूट

>> अन्न, किराणा सामान आणि जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी देणाऱ्या सेवा

>> पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

>> रुग्णालय, मेडिकल, फार्मा कंपनी, लॅब, नर्सिंग महाविद्यालये, प्रयोगशाळा, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना सूट

>> प्रसारमाध्यमांचे कर्मचारी, प्रतिनिधी

>> दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेतील कर्मचारी

>> वीज, पेट्रोलियम, तेल आणि ऊर्जा संबंधित

>> बँकिंग, स्टॉक एक्सजेंच, सेबी नोंदणीकृत पदाधिकारी

>> आयटी आणि आयटी कंपनीशी संबंधित सेवा, डेटा सेंटर सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रदान करणारे कर्मचारी

>> बंदरे

>> ई-कॉमर्स कंपन्या केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी

>> या सर्व सेवांशी संबंधित माल आणि मनुष्यबळ वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो

Lalbaugcha Raja: ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; मंडळाचा ऐतिहासिक निर्णयSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

All India Marathi Literary Meet: आज ठरणार संमेलनाध्यक्ष – today will be decide the president of the 94 th all india marathi literary meet

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकनाशिकमध्ये होऊ घातलेले ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या असून, २६ ते २८ मार्चदरम्यान...

India vs England: IND vs ENG : भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मिळू शकते सरप्राइज गिफ्ट – ind vs eng : in india...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय चाहत्यांसाठी काही दिवसांत एक आनंदाची बातमी येऊ शकते. कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय चाहत्यांना एक आनंदाची बातमी...

Recent Comments