Home शहरं मुंबई Cyclone Nisarga Update: रत्नागिरीजवळ व्यापारी जहाज वादळात अडकले; मदतकार्य सुरू

Cyclone Nisarga Update: रत्नागिरीजवळ व्यापारी जहाज वादळात अडकले; मदतकार्य सुरू


मुंबई: मुंबईच्या दिशेनं येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररूप धारण केले आहे. रत्नागिरीजवळ ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले असून जहाजाला सुखरूप मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. (Basara Star ship stuck in Cyclone)

Nisarga Live: जाणून घ्या निसर्ग चक्रीवादळाविषयीची ताजी माहिती

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं उठलेलं चक्रीवादळ आता मुंबईच्या दिशेनं कूच करत आहे. सध्या रत्नागिरीत हे वादळ घोंगावत असून या वादळाच्या तडाख्यात एक व्यापारी जहाज सापडले आहे. या जहाजाला मुंबई किनाऱ्यावर यायचे होते. पण रत्नागिरीजवळील मिरकरवाडी भागात हे जहाज जोरदार वादळात व खवळलेल्या समुद्रात अडकून पडले. त्यांनी वरळीतील तटरक्षक दलाच्या समुद्री बचाव केंद्राला मदतीचा संदेश पाठवला. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या परिसरातील नौकायान मंत्रालयाच्या बचाव नौकेला विनंती केली. त्या विनंतीवरून बचाव नौका तिथे पोहोचली. ‘टोइंग’ प्रकारची ही नौका आता या व्यापारी जहाजाला हळूहळू मुंबईत आणत आहे.

वाचा: जूनमधील दोन वर्षातलं दुसरं तीव्र चक्रीवादळ; निसर्ग १०० वर्षांचा विक्रम मोडणार?

‘निसर्ग’ वादळ दुपारपर्यंत अलिबागच्या किनाऱ्यावर पोहोचेल. त्यानंतर १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान मुंबईत धडकेल, असा अंदाज आहे. गुजरातमधील नवसारी आणि वलसाडला पोहोचेपर्यंत वादळाचा वेग ताशी ६०-८० किमी असेल. तर आज मध्यरात्रीपर्यंत ‘निसर्ग’चा वेग आणखी कमी होईल आणि गुरुवारी सकाळपर्यंत वादळ बऱ्यापैकी ओसरेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, हे वादळ ५० किलोमीटरने दक्षिण दिशेला सरकलं आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेल्या ‘या’ महान क्रिकेटपटूंना वाहणार श्रद्धांजली – india, australia players to wear black armbands during...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेले ऑस्ट्रेलियाचे...

Recent Comments