Home महाराष्ट्र cyclone nisarga updates: 'निसर्ग'शी लढा: नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात - western...

cyclone nisarga updates: ‘निसर्ग’शी लढा: नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात – western naval command teams gear up for cyclone nisarga


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

निसर्ग वादळ काळात नागरिकांच्या बचावकार्यासाठी नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात सज्ज झाल्या आहेत. मुंबई तसेच परिसरासाठी आठ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यात जलतरण चमूचाही समावेश आहे.

हे वादळ रायगड ते ठाणे किनारपट्टीदरम्यान धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार या सर्व किनारपट्टी भागात नागरिकांच्या बचावकार्यासाठी नौदलाने त्यांच्या महत्त्वाच्या नौका मंगळवारी दुपारी मुंबईच्या गोदीतून बाहेर काढल्या. या नौका रायगड ते पालघरदरम्यानच्या अरबी समुद्रात परंतु किनारपट्टीजवळ सज्ज करण्यात आल्या आहेत. वादळादरम्यान किनारपट्टीवरील भागात नागरिक अडकल्यास त्यांना या नौकांद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल. या कामासाठी नौदलाकडून उभयचर श्रेणीतील जहाजाचा उपयोग केला जातो. परंतु पश्चिम कमांडकडे असे जहाज नाही. यामुळेच आयएनएस कोलकाता व आयएनएस मुंबई श्रेणीतील विनाशिका तसेच आयएनएस गोमती श्रेणीतील फ्रिगेट्स या कामासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यास तेथून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पाच बचाव पथके कुलाबा व मानखुर्द येथे तैनात आहेत. यामध्ये रबरी बोट, वैद्यकीय सहाय्यक व जीवरक्षक सामग्रीचा समावेश असेल. तसेच तीन जलतरण चमूदेखील सज्ज आहेत. हे आठ चमू मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली या सर्व परिसरासाठी सेवा देणार आहे. या पथकांची ने-आण करण्यासह नागरिकांना वेळप्रसंगी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी हेलिकॉप्टरदेखील कुलाब्यातील आयएनएस शिक्रा या तळावर सज्ज करण्यात आले आहेत.

तटरक्षक दल समुद्रात

वादळाआधी सर्व मच्छिमारांना किनारपट्टीवर जाण्याचे आवाहन करण्यासाठी तटरक्षक दलाने गोवा ते गुजरातपर्यंतच्या समुद्रात मोहीम हाती घेतली आहे. मच्छिमार नौकांना परत पाठविण्यासाठी विमानाचे साहाय्यदेखील घेतले जात आहे. डॉर्निअर विमानाद्वारे समुद्रात सातत्याने फेऱ्या मारल्या जात आहेत.

एनडीआरएफची जनजागृती

या वादळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दहा तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत तीन, रायगड आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी दोन;तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एका तुकडीचा समावेश आहे, अशी माहिती एनडीआरएफ, महाराष्ट्रचे प्रमुख कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे. एनडीआरएफच्या तुकड्यांनी मंगळवारी संबंधित भागांची पाहणी केली. तसेच या चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. वादळापासून बचावासाठी किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

india pakistan news: India Slams Pakistan For Presenting Dossier Of Lies At Un – Pakistan Terrorism पाकिस्तानने अबोटाबाद लक्षात ठेवावे; भारताने सुनावले

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले सर्वाधिक दहशतवादी आणि दहशतवादी संघटना पाकिस्तानात असल्याचे निक्षून सांगून 'पाकिस्तानच्या अबोटाबादमध्येच जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडून...

ajit pawar: मुख्यमंत्रिपदाचा योग कधी? अजित पवार म्हणाले… – what ajit pawar said on the question regarding cm post

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पत्रकारांच्या एका अनपेक्षित प्रश्नाला सामोरं जावं लागलं. अर्थात, अजित पवार...

Recent Comments