Home शहरं मुंबई cyclone nisarga updates: 'या' वादळाचा वेग आणि ताकद मोठी आहे; सावध रहा:...

cyclone nisarga updates: ‘या’ वादळाचा वेग आणि ताकद मोठी आहे; सावध रहा: उपमुख्यमंत्री – stay in a safe place until the cyclone subsides: ajit pawar


मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Nisarga Live: कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला!

चक्रीवादळापासून जीवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाइफगार्ड, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Cyclone Nisarga: ‘निसर्ग’ने धारण केले रौद्र रूप; मुंबईसह ४ जिल्ह्यांना धोका

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री वादळाच्या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे, याची तपशीलवार माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आपत्तीच्या प्रसंगी केंद्र सरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यापूर्वी वादळे येऊन गेली. पण हे नुसते वादळ नसून चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. करोनाच्या संकटाला ज्याप्रमाणे आपण संयम, जिद्द आणि धैर्याने सामोरे गेलो त्याप्रमाणे याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि सहिसलामत बाहेर येऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बुधवार व गुरुवार चक्रीवादळाच्या दृष्टीने धोक्याचे असल्याने नागरिकांनी दोन्ही दिवस घरीच सुरक्षित राहावे. दुकाने, उद्योग, आस्थापना पूर्णत: बंद ठेवाव्यात. कुणीही घराबाहेर जाऊ नये, घरात राहण्यातच सर्वांचे हित आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानंतर आज उपमुख्यमंत्र्यांनीही नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे.

Cyclone Nisarga: ‘निसर्ग’ काही तासांत अलिबाग किनारी



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Sharma: AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल – aus vs ind: lokesh rahul, mayank agarwal...

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले...

Kangana Ranaut Share Photo With Sanjay Dutt Netizen Trolled Her – संजय दत्तला भेटायला गेली कंगना रणौत, यूझर्स म्हणाले- शेवटी नेपोकिड, चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या कंगना रणौत तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान,...

farmers protest on burari nirankari ground: अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत एन्ट्री, बुराडी मैदानात आंदोलनाची परवानगी – farmer protest delhi burari nirankari ground police permission farm...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना...

mumbai news News : NCP: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी – candidate who rebelled against shiv sena expelled from ncp

मुंबई: अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर...

Recent Comments