Home क्रीडा Dale Steyn: लॉकडाऊनमध्ये या क्रिकेटपटूच्या घरी झाली तब्बल तीनवेळा चोरी - 3...

Dale Steyn: लॉकडाऊनमध्ये या क्रिकेटपटूच्या घरी झाली तब्बल तीनवेळा चोरी – 3 attempted break ins since friday at my house, said south african bowler dale steyn


करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात सर्वांनाच आपल्या घरी राहायचे आवाहन करण्यात आले होते. पण लॉकडाऊनच्या काळात चोरीचे प्रमाणही वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात तर एका क्रिकेटपटूच्या घरी तर चक्क तीन वेळा चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

लॉकडाऊनमध्ये जास्त लोकं रस्त्यावर नसतात. प्रत्येक जण आपल्या घरामध्येच काही ना काही काम करत असतो. ही गोष्ट चोरांसाठी फावल्याचे पाहायला मिळत आहे. जास्त लोकं नसल्यामुळे चोरी करण्याचे प्रकार आता वाढत चालले आहेत.

या क्रिकेटपटूने सांगितले की, ” लॉकडाऊनच्या तिसऱ्या चरणामध्ये माझ्या घरी तीनवेळा चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोरांनी माझ्या
मित्राची गाडी फोडून काही गोष्टी लंपासही केल्या आहेत. काल रात्री माझ्या घरी पुन्हा एकदा चोर घुसले होते. या चोरांनी माझ्या आईला घाबरवण्याचा प्रयत्न केला. सध्या माझ्या घरात आई एकटीच राहत आहे. या सर्व प्रकारामुळे ती घाबरली आहे.”

लॉकडाऊनच्या काळात चोरांनी बऱ्याच जणांचे नुकसान केल्याच्या घटनाही पुढे येत आहेत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्या फोडून चोरी करण्याचे प्रकार आता वाढत चालले आहे.

कोणत्या क्रिकेटपटूच्या घरी झाली तीनवेळा चोरी
लॉकडाऊनच्या काळात तब्बल तीन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या घरात झाला आहे. ही माहिती स्टेनने एक ट्विट करत दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वांनी सुरक्षित राहायला हवे, असे आवाहनही त्याने केले आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virar: महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चाकूने भोसकले; विरारमध्ये खळबळ – mumbai palghar woman stabbed an auto driver at virar

विरार: बाचाबाचीनंतर एका महिलेने रिक्षाचालकाला भर रस्त्यात भोसकले. मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील विरारमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. महिला आणि रिक्षाचालकाने परस्परांविरोधात पोलीस...

PM Narendra Modi: मोदींच्या मनात का बा?; चिराग पासवानांवर एक शब्दही बोलले नाहीत मोदी – bihar election 2020 pm prime minister narendra modi did...

सासाराम:पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बिहार निवडणुकीतील (Bihar Assembly Election) एनडीएच्या प्रचारासाठी सासाराम येथे पहिली प्रचारसभा घेतली. या सभेत मोदींनी केवळ...

Ajit Pawar in Action: होम क्वारंटाइन असतानाही अजित पवार ‘इन अॅक्शन’ – home quarantined ajit pawar working from home

मुंबई: थकवा जाणवत असल्यामुळं खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आहेत. घरातूनच त्यांचे कार्यालयीन...

Recent Comments