Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल data hacking: फेसबुकचा पासवर्ड तात्काळ बदला, या २५ अॅप्सपासून मोठा धोका -...

data hacking: फेसबुकचा पासवर्ड तात्काळ बदला, या २५ अॅप्सपासून मोठा धोका – data hacking: instantly change facebook password, these 25 apps are a big risk


नवी दिल्लीः स्मार्टफोन युजर्ससाठी व्हायरस अॅप मोठे संकट बनले आहे. तुम्ही जर फेसबुक युजर असाल किंवा फोनवर फेसबुकचा वापर करीत असाल तर आता तुम्हाला अलर्ट राहणे गरजेचे आहे. रिसर्चर्सने गुगल प्ले स्टोरवर धोकादायक अँड्रॉयड २५ अॅप्सची ओळख पटवली आहे. जे युजर्सच्या फेसबुक पासवर्डची चोरी करून डेटा अॅक्सेस करीत आहेत. चिंता करण्याची बाब म्हणजे या अॅप्सला जगभरात २३ लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

वाचाः रेडमीच्या या फोनचा आज सेल, जबरदस्त ऑफर्स

अकाउंटवर ठेवतात नजर
सायबर सिक्योरिटी एक्स्पर्ट्स ने सांगितले की, मलीशस अॅप स्वतःला स्टेप काउंटर, वॉलपेपर किंवा मोबाइल गेम सारखे अॅप्स असल्याचे सांगतात. या अॅप्सच्या आडून रिमोट लोकेशनवर बसून हे हॅकर जगातील कोणत्याही कोपऱ्यात कोणालाही टार्गेट करण्यासाठी फेसबुक अकाउंटवर नजर ठेवू शकतात.

गुगलने प्ले स्टोरवरून हटवले अॅप
या आठवड्यात आलेल्या ZDNet च्या एका रिपोर्टमध्ये फ्रेंच टेक फर्म Evina च्या सायबर सिक्योरिटी एक्स्पर्ट्स ने या २५ फेक अॅप्सची माहिती दिली होती. एक्सपर्ट्सने सांगितले होते की, हे सर्व अॅप्स स्वतः ओरिजनल अॅप सांगून युजर्सचा डेटाला नुकसान पोहोचवण्याचे काम करीत आहे. एविनाच्या अलर्टनंतर गुगलने तात्काळ कारवाई करीत या अॅप्सला प्ले स्टोरवरून हटवले आहे.

वाचाः TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

फेक लॉगइन पेजवरून करतात रिप्लेस
सायबर सिक्योरिटी एक्स्पर्ट्सने या अॅप्सच्या द्वारे हॅकरने युजर्सचे फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड चोरी करू शकतात. हे अॅप डाऊनलोड झाल्यानंतर ओरिजनल फेसबुक अॅप फेक लॉगइन पेजवरून रिप्लेस करते. तसेच युजर्सच्या कोणत्याही परवानगी विना फेसबुक लॉगइन डिटेल्सला एंटर करतात.

मोठी कमाई करण्याचा खेळ
हॅकर्स युजरनेम आणि पासवर्ड चोरी केल्यानंतर त्याचे नेमके काय करतात, याची माहिती समोर आली नाही. परंतु, आधीच्या माहितीनुसार, लॉगइनची डिटेल्सला हॅकर्स डार्क वेबवर दुसऱ्या सायबर क्रिमिनल्सला विकून मोठी कमाई करीत असल्याचे समोर आले होते.

वाचाः फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंद

वाचाः फोनमधून हटवा चीनी अॅप, असे निवडा भारतीय अॅप

वाचाः शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘त्यांची’ झेप देहविक्रीकडून आत्मनिर्भरतेकडे

: ग्राहकाची वाट पाहणे हे व्यावसायिकाचे नशीबच असते. त्याला कुणीही अपवाद नाही, अगदी देहविक्रय करणाऱ्या महिलादेखील. परंतु, करोनासारख्या साथीमुळे 'सुरक्षित वावरा'चा नारा...

Recent Comments