Home देश Daulat Beg Oldie: फोटोफीचर: दौलत बेग ओल्डी; भारत येथून पिरगाळू शकतो चीनची...

Daulat Beg Oldie: फोटोफीचर: दौलत बेग ओल्डी; भारत येथून पिरगाळू शकतो चीनची मान – daulat beg oldie india can answer china with the highest airstrip and 250 kms dsdbo roadलडाखमधील भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. या हाणामारीत चीनचेही काही सैनिक मारले गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चीनने या बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान चर्चेअंती मार्ग निघाल्याचे स्पष्ट होत असतानाच चीनचे सैनिक गलवान खोऱ्याच दररोज कुरघोड्या करत असल्याचेही स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर लडाखमधील दौलत बेग ओल्डी हा परिसर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. लडाखमधील भारतीय क्षेत्रात असलेला हा भाग सर्वाच उंचावरील भाग आहे. चो डीबीओ या नावाने प्रसिद्ध आहे. या भागाचे सामरिक महत्त्व असलेला सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

LAC च्या समानांतर बनला आहे DSDBO मार्ग

दारबूक श्योक दौलत बेग ओल्डी, अर्थात DSDBO या मार्गाची लांबी थोडी थोडकी नसून ती तब्बल २५४ किमी इतकी आहे. याच रस्त्याच्या द्वारे लडाखचा भाग चीनपासून वेगळा होतो. याच परिसरात दौलत बेग ओल्डी आहे. दौलत बेग ओल्डी या परिसरापासून अवघ्या ७ किमीच्या अंतरावर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आहे. हा रस्ता दारबूक पासून भारताचे शेवटे गाव असलेले श्योक पर्यंत जातो. भारत आणि चीन दरम्यान जेव्हा जेव्हा तणावाची स्थिती निर्माण होते, तेव्हा तेव्हा डीएसडीबीओ हा मार्ग चर्चेत येतो.

१६००० फूटावर तयार झालेला रस्त्याची होणार मोठी मदत

maharashtra times

दौलत बेग ओल्डीचा हा युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जाणारा परिसर श्योक खोरे आणि दारबूक या परिसराला या १६०० फूटांवरील रस्त्याने जोडण्यात आले आहे. १६००० फूटांवर निर्मिती करण्यात आलेल्या या रस्त्याचे नाव DSDBO या नावाने ओळखले जाते. डीएसडीबीओ म्हणजे दारबूक श्योक दौलत बेग ओल्डी. इतक्या उंचीवर तयार करण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यामुळे लेह आणि काराकोरम हे प्रदेशही जोडले गेले आहेत.

१९६२ मध्ये तयार करण्यात आली होती हवाई पट्टी

maharashtra times

सन १९६२ मध्ये भारत आणि तीन युद्धाच्या दरम्यान दौलत बेग ओल्डीची हवाई पट्टीची निर्मिती करण्यात आली. या हवाई पट्टीवर काही वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या सुपर हरक्युलस विमाने उतरण्यात आली होती. या व्यतिरिक्त येथे अनेक मोठी लढाऊ विमानांचे लँडिग देखील झालेले आहे. अशात या जगातील सर्वात उंचावर असलेल्या या एअरस्ट्रीपवर लँडिंग आणि ऑपरेशनच्या जुन्या अनुभवामुळे हवाईदलाला युद्धाच्या वेळी मोठा फायदा मिळू शकतो.

भारतीय हवाईदलाचे प्रगत लँडिंग ग्राउंड

maharashtra times

दौलत बेग ओल्डी अर्थात डीबीओचा हा परिसर जगातील सर्वात एअरस्ट्रीपसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात तीन वर्षांपूर्वी भारतीय हवाईदलाच्या मोठ्या विमानांची लँडिंग केली गेली होती. दौलत बेग ओल्डी हा भाग श्योक आणि काराकोरमच्या मध्ये आहे. दौलत बेग ओल्डी परिसराला सामरिक महत्व असल्याने या भागाकडे म्हणजे भारतीय हवाई दलाच्या एका प्रगत लँडिंग ग्राउंडच्या रुपात पाहिले जात आहे. भारत आण चीन दरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर तर हा भाग प्रकाशझोतात आला आहे.

जगातील सर्वांत उंचीवरील हवाई धावपट्टी

maharashtra times

पूर्व लडाखमध्ये असलेल्या दौलत बेग ओल्डी या महत्त्वाच्या परिसरात जगातील सर्वात उंचीवर असलेली एअरस्ट्रीप आहे. विशेष महत्वाचे म्हणजे या एअरस्ट्रीपचे भारताचे अधिपत्य आहे. भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दौलत बेग ओल्डी या परिसराला मोठे महत्व आले आहे. हे पाहता चीनशी सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर मालवाहू विमानांपासून ते लढाऊ विमाने पोहोचण्यासाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

ajit pawar: Ajit Pawar: ‘मुंबई पोलिसांच्या ‘या’ पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही’ – mumbai terror attacks ajit pawar paid homage to the martyrs

मुंबई: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण...

Recent Comments