Home देश Delhi Corona Update: दिल्ली सरकारने घाबरवले, सामूहिक संसर्ग नाहीः अमित शहा -...

Delhi Corona Update: दिल्ली सरकारने घाबरवले, सामूहिक संसर्ग नाहीः अमित शहा – delhi coronavirus update no community spread says amit shah


नवी दिल्लीः दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ८० हजाराच्या वर गेली आहे. पण दिल्लीत सध्यातरी करोनाचा सामूहिक संसर्ग झालेला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात देशातील तीन वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. दिल्लीत करोनाचा सामूहिक संसर्ग झाला नसल्याचं डॉक्टरांनी या चर्चेत सांगितलं, असं शहा म्हणाले.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या वक्तव्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दिल्लीत जुलै अखेरपर्यंत करोनाचे ५.५ लाख रुग्ण असतील, असं ते म्हणाले होते. या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्ली सरकारची मदत करण्याच्या सूचना आपल्याला दिल्या होत्या. दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. आता हे मॉडेल एनसीआरमध्येही लागू केलं जाणार आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेश आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं.

सर्वांच्या सहमतीने निर्णय

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीत जे काही निर्णय घेतले जात आहेत त्यावरून दिल्ली सरकारसोबत कुठलीही रस्सीखेच नाहीए. सर्व निर्णय हे दिल्ली सरकारच्या सहमीतने घेतले जात आहेत. दिल्लीत करोनाच्या उपचारावरून अनेक तक्रारी आल्या होत्या. खास करून करोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करता येत नव्हते. यामुळे ३५० मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून होते. आता त्यासाठी एक व्यवस्था बनवण्यात आली आहे, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधी यांचा निशाणा, म्हणाले…

दिल्लीतील हॉस्पिटल्समध्ये करोनावरील उपचाराबाबतच्या ढिसाळ नियोजनावर अनेक तक्रारी आल्या होत्या. यानंतर आम्ही एम्समध्ये एक हेल्पलाइन बनवली. याद्वारे एम्सचे डॉक्टर दिल्लीच्या हॉस्पिटल्समधील डॉक्टरांना मार्गदर्शन किंवा सूचना करू शकतात. यासह डॉक्टरांच्या तीन टीम बनवण्यात आल्या आहेत. ज्यात केंद्र, आयसीएमआर आणि दिल्लीच्या डॉक्टरांचाही समावेश आहे. त्याच्या सूचनांवरून दिल्लीतील हॉस्पिटल्समधल्या त्रूटी दूर झाल्या आहेत, असं शहा म्हणाले.

संसदेत चर्चेला या, दोन हात होऊन जाऊ द्या; अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान

चाचण्या वाढल्याने रुग्णही वाढणार

दिल्लीत डॉक्टरस् आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात येत आहे. दक्षिण दिल्ली बनवण्यात आलेल्या १० हजार बेडच्या आयसोलेशन सेंटरमध्ये आयटीबीपीचा मेडिकल स्टाफ नेमण्यात आला आहे. अशाच प्रकारे रेल्वेच्या १६ हजार बेडची जबाबदारी लष्कराने घेतली आली आहे. आधी दिल्लीत चाचण्या कमी होत होत्या. यामुळे रुग्णही कमी आढळत होते. आता चार पट चाचण्या वाढल्याने रुगही वाढले आहेत. दिल्लीतील एलएनजेपी हॉस्पिटलला आपण भेट दिली. यामुळे जनतेचा विश्वास वाढला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले. नर्सेशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक करोना वॉर्डमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आला आहे. किचनसाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे, असं अमित शहा यांनी सांगितलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: Kangana Ranaut : कंगना रनौट होणार मुंबई पोलिसांसमोर हजर; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश – bombay high court grants interim protection from arrest...

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई हायकोर्टाने आज झालेल्या सुनावणीवेळी दिलासा दिला आहे. त्यांना सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अटक...

covid 19 norms in aurangabad: विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३९ लाखांवर दंड वसूल – more than 39 lakh fine recovered from who violate covid 19 norms...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादविनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्यासात महिन्यांत सात हजार ८६५ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ३९...

Nashik News : मुंबईच्या वाहनांना सातपूरचा पर्याय – transport on the flyover from dwarka to meenatai thackeray stadium will be closed soon in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकद्वारका ते मीनाताई ठाकरे स्टेडियम या भागातील उड्डाणपुलावरील वाहतूक लवकरच बंद करण्यात येणार आहे. के. के. वाघ महाविद्यालय ते...

Recent Comments