Home देश Delhi Violence: दिल्ली दंगल : 'त्या' भाषणाचा कोणताही पस्तावा नाही, भाजप नेते...

Delhi Violence: दिल्ली दंगल : ‘त्या’ भाषणाचा कोणताही पस्तावा नाही, भाजप नेते कपिल मिश्रांचा तोरा कायम – delhi violence bjp leader kapil mishra said i have no regrets if needed i will do same again


हायलाइट्स:

  • दिल्ली दंगलीला एक वर्ष पूर्ण
  • ‘दिल्ली रॉयटस् २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तक प्रकाशन सोहळा
  • गरज लागली तर पुन्हा असंच करणार : कपिल मिश्रा
  • मिश्रांचं भाषण भावना भडकावणारं : दिल्ली अल्पसंख्यांक आयोग

नवी दिल्ली : गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगलीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. या दंगलीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. याच दरम्यान भाजप नेते कपिल मिश्रा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. सीएए विरोधी आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधणाऱ्या आपल्या भाषणाचा आपल्याला आजही कोणताही पस्तावा नाही, गरज लागली तर पुन्हा असंच करणार, असं भाजप नेते कपिल मिश्रा यांनी म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी उसळलेली दिल्ली दंगल कपिल मिश्रा यांच्या ‘भावना भडकावणाऱ्या’ भाषणानंतर सुरु झाल्याचं दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. दिल्ली पोलिसांनी मात्र कपिल मिश्रा यांच्या भाषणाला क्लीन चीट दिली होती.

दिल्ली दंगलीत ५३ जणांनी गमावले जीव

कपिल मिश्रा यांनी जाफराबादमध्ये केलेल्या आपल्या वादग्रस्त भाषणात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना हटवण्याची धमकी दिली होती. कपिल मिश्रा यांच्या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत दंगल उसळली होती. या दंगलीत जवळपास ५३ जण ठार झाले होते तर शेकडो जण जखमी झाले होते.

‘मी जे केलंय, ते मी पुन्हा करेन. मला कोणताही पस्तावा नाही. केवळ दिनेश खटीक अंकित शर्मा आणि इतरांचे प्राण मी वाचवू शकलो नाही, केवळ याचं शल्य कायम राहील’ असं कपिल मिश्रा यांनी ‘दिल्ली रॉयटस् २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ नावाच्या पुस्तकाच्या प्रकाशना दरम्यान म्हटलं.

‘कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांना भ्रमित कसं करणार’; भाजप कार्यकर्त्याचा सवाल व्हायरल
युपीत राडा; भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये हाणामारी, अनेक जखमी
पुस्तक प्रकाशनाचा वाद

उल्लेखनीय म्हणजे, ‘दिल्ली रॉयटस् २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही चर्चेत आलं होतं. याचं कारण म्हणजे ‘ब्लुम्सबरी’नं हे पुस्तक छापण्यात नकार दिला होता. पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व ऑनलाईन प्रकाशनासाठी अतिथि म्हणून कपिल मिश्रा यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यासाठी ‘ब्लुम्सबरी’ला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागल्यानंतर त्यांनी पुस्तक न छापण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मात्र हे पुस्तक ‘गरुड प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड’कडून छापण्यात आलं.

करोना लसीकरण : दुसऱ्या टप्प्यात कुणाला लस मोफत, कुणी मोजणार पैसे
भाग्योदय! पन्नामध्ये खाणीत राबणाऱ्या मजुरांना सापडले हिरेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Asif Shaikh: माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल – police file fir against former mla asif shaikh for violate covid norms in malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकाँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी...

Beef Racket: अवैधरित्या सुरु होता कत्तलखाना; पोलिसांनी धाड टाकताच…. – beef racket busted in amravati, one arrested

अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका...

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

Recent Comments