Home शहरं मुंबई Devendra Fadnavis: मुंबईत करोनाचा मृत्यूदर वाढतोय; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - devendra fadnavis...

Devendra Fadnavis: मुंबईत करोनाचा मृत्यूदर वाढतोय; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र – devendra fadnavis write open letter to cm uddhav thackeray cover coronavirus pandemic


मुंबईः मुंबई आणि महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजन अभावी करोनाचे रुग्ण आणि करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दाखवण्याबाबत अद्यापही पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

मुंबई व महाराष्ट्रातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. १९ जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक ३, ८२७ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत सर्वाधिक बळींची संख्या ११४ इतकी नोंदवली आहे. १८ जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर राज्यातील एकूण करोना रुग्णांच्या संख्येत ५२.१८ टक्के वाटा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई व एमएमआर क्षेत्राचा विचार केला, तर हा वाटा ७३.८५ टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर हा ५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे, असं फडणवीस यांनी मुंबईच्या वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

वाचाः महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त सभा सोडून निघाले

गेले तीन महिने सातत्याने करोना बळींची संख्या लपवली जात होती. त्याबाबत सूचित केल्यानंतर एकाच दिवशी राज्यभरातील बळीची संख्या १३२८नं वाढली आहे. तरी नवीन बळींच्या संख्येत जूनच्या या १८ दिवसांत महाराष्ट्रात ३६.१६ टक्क्यांनी वाढ झाली असून ती वाढ ३५.१६ टक्के इतकी आहे. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

वाचाः ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्तीचं राजू शेट्टी यांना रक्तानं पत्र

मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. करोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. यापूर्वीसुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात १२ जणांना ऑक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावे लागले. हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवितात. आपण स्वतः या सर्व प्रकारांत लक्ष घालावे आणि हे दोष दूर करावेत”, याबाबतही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bjp vs ncp clash in sangli: BJP vs NCP: सांगलीत भाजप-राष्ट्रवादीचं जीवघेणं राजकारण; ग्रामपंचायतीच्या दारात सदस्याचा बळी – clashes between bjp and ncp in...

हायलाइट्स:उपसरपंच निवडीवरून भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारीमारहाणीत राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू.कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील धक्कादायक घटना.सांगली:सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वादातून भाजप...

Recent Comments