Home महाराष्ट्र Devendra Fadnavis on Maharashtra Government: करोनाच्या लढाईसाठी सरकारची रणनीती चुकीची; फडणवीसांचा आरोप...

Devendra Fadnavis on Maharashtra Government: करोनाच्या लढाईसाठी सरकारची रणनीती चुकीची; फडणवीसांचा आरोप – devendra fadnavis on maharashtra government over coronavirus panedemic in maharashtra


मुंबईः महाराष्ट्रासह मुंबईत करोनाचा संसर्ग वाढत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत. करोनाच्या लढाईत व खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरचं मालक आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपच्या महाराष्ट्र जनसंवाद रॅलीत ते बोलत होते.

महाराष्ट्र जनसंवाद रॅलीत फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पियुष गोयल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नारायण राणे आदी नेते उपस्थित होते.

करोनाची ही परिस्थिती हाताळताना सरकारकडून चुका होत आहेत. चाचणी कमी करून ही लढाई जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. मी टीका करीत नाही. केवळ सूचना करतो आहे. पण हे सरकार करोनाशी नाही आकडेवारीशी लढते आहे. महाराष्ट्रात वाढणार करोनाचा आकडा ही चिंतेची बाब आहे. यावर सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. असं ते म्हणाले.

वाचाः राज्यात करोनारुग्णांचा नवा उच्चांक; आज ५४९३ नवे बाधित, १५६ मृत्यू

कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले, तेव्हा सुद्धा राज्य सरकारची मदत पोहोचण्यापूर्वी भाजपची मदत पोहोचली. मजबूत नेता असला की किती वेगाने काम होऊ शकते, याचा आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिला. करोनाच्या काळात अतिशय भक्कम काम, प्रत्येक घटकासाठीही त्यांनी काम केल्याचे फडणवीस म्हणाले.

वाचाः पोलीस भरती प्रक्रिया लवकरच, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

कापूस खरेदी होत नसताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पाठपुरावा केला. पण राज्य सरकारने त्याचा लाभ घेतला नाही. आज लघु आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. ५० हजार उद्योगांना ४००० कोटींवर मदत मिळाली आहे. असही ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार, उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments